फक्त 1149 रुपयात विकत घ्या 22 हजार रुपयांचा 5G स्मार्टफोन, कसं ते जाणून घ्या
प्रत्येक जण चांगल्या ऑफर्सची वाट पाहात असतो. कारण ऑफरमध्ये एखादा चांगला फोन तर मिळतोच, त्याबरोबर पैशांची देखील बचत होते. अशीच एक तगडी ऑफर मोटोरोलाच्या 5 जी स्मार्टफोनवर देण्यात आली आहे.
मुंबई : प्रत्येकाला वाटत असतं आपल्याला स्वस्तात मस्त फोन मिळाला पाहीजे. यासाठी प्रत्येक जण चांगल्या ऑफर्सची वाट पाहात असतो. कारण ऑफरमध्ये एखादा चांगला फोन तर मिळतोच, त्याबरोबर पैशांची देखील बचत होते. अशीच एक तगडी ऑफर फ्लिपकार्टवर देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये Moto G62 5G स्मार्टफोन अवघ्या 1149 रुपयात विकत मिळत आहे. या स्मार्टफोनमधये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 405 पिक्सल प्रति इंच पिक्सल डेनसिटीसह येतो. कॅमेराचं बोलायचं तर यामध्ये व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच मागच्या बाजूला तीन कॅमेरे आहेत. यात प्रायमरी 50 एमपी कॅमेरा, 8 एमपी अल्ट्रा वाइड आणि 2 एमपी मॅक्रो कॅमेरा आहे. चला जाणून घेऊयात या ऑफर्सचा लाभ कसा घेता येईल.
Motorola G62 5G Price in India
फ्लिपकार्टवर मोटोरोला जी62 या स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज फोनवर ऑफर देण्यात आली आहे. या व्हेरियंटवर 31 टक्के सूट दिल्याने 21,999 रुपयांचा फोन थेट 14 हजार 999 रुपयांना मिळत आहे. या व्यतिरिक्त देखील यावर ऑफर मिळतात. त्यामुळे ही किंमत आणखी कमी होते.फ्लिपकार्टवर एक्सिस बँकेच्या कार्डचा वापर करून हा फोन घेतल्यास 5 टक्के कॅशबॅक दिला जाईल. त्याचबरोबर जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्ही 13 हजार 850 रुपयांची बचत करू शकता.
पूर्ण एक्सचेंज मिळाल्यानंतर स्मार्टफोनची किंमत
जुन्या स्मार्टफोन एक्सचेंज करताना जर पूर्ण रक्कम मिळाली तर या फोनची किंमत 1149 रुपये (14999 (फोनची किंमत) वजा 13850 (एक्सचेंज डिस्काउंट)= 1449 (पूर्ण एक्सचेंज किंमत मिळाल्यानंतर)) इतकी होते.
मोटोरोला G62 5G स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी असून 20 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. प्रोसेसरबाबत म्हणायचं तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मोटो जी 62 मध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 965 चिपसेट दिली आहे.त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी अँड्रेंना 610 जीपीयू दिलं आहे.