Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आला रे आला मोटोचा G71s 5G स्मार्टफोन आला… 5000mAh बॅटरीसह 50MP ट्रिपल कॅमेरा

हा स्मार्टफोन Snapdragon 695 Soc ने परिपूर्ण असून Moto G71s 5G फोनचा सक्सेसर आहे. त्याला मागील वर्षी भारतात लाँच करण्यात आले होते. या नवीन फोनमध्ये अनेक प्रकारचे अपग्रेटदेखील देण्यात आलेले आहेत. Moto G71s 5G 128GB च्या इनबिल्ट स्टोरेजसह येतो.

आला रे आला मोटोचा G71s 5G स्मार्टफोन आला... 5000mAh बॅटरीसह 50MP ट्रिपल कॅमेरा
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 1:11 PM

मोटोरोलाने (Motorola) नुकतेच एक नवीन 5G स्मार्टफोन Moto G71s लाँच (launch) केला आहे. नवीन मोटोजी सिरीजचा नवीन फोनचा डिसप्ले 120hZ रिफ्रेश रेटसोबत येणार आहे. सर्वात खास म्हणजे, हा स्मार्टफोन Snapdragon 695 Soc ने परिपूर्ण राहणार आहे. हा Moto G71 5G फोनचा सक्सेसर असून त्याला मागील वर्षी भारतात लाँच करण्यात आले होते. या नवीन फोनमध्ये (smartphone) अनेक प्रकारचे अपग्रेटदेखील देण्यात आलेले आहेत. Moto G71s 5G 128GB च्या इनबिल्ट स्टोरेजसह येतो. या शिवाय, याच्या खास फीचर्समध्ये ड्युअल स्टीरियो स्पीकर आणि डॉल्बी ॲटम्सचा सपोर्टही देण्यात आलेला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरीदेखील देण्यात आलेली आहे. Moto G71s 5G ला पहिले युरोपमध्ये लाँच करण्यात आले होते. त्याठिकाणी याची किंमत 299.99 EUR होती. भारतीय चलनानुसार ती जवळपास 25,200 रुपये आहे. भारतात या फोनला 6GB+128GB रॅम स्टोरेज व्हेरिएंटसाठी 18,999 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात येईल.

किती आहे किंमत

Moto G71s 5G च्या 8GB रॅम +128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1699 CNY म्हणजेच जवळपास 19,500 रुपयांच्या जवळपास आहे. हा स्टार ब्लॅक आणि हाओयू कलर ऑप्शनसह उपलब्ध आहे. Weibo पोस्टच्या मते, Moto G71s 5G पहिल्यापासूनच JD.com, Tmail आणि प्रमुख ऑफलाइन स्टोर्सच्या माध्यमातून देशात विक्रीसाठी उपलब्ध आहे. नवीन मोटो Moto G71s 5G Android 12 वर रन होतो आहे. आणि My UI 3.0 ने परिपूर्ण आहे.

हे सुद्धा वाचा

डिसप्ले

नवीन मोटा फोनमध्ये 6.6 इंचांचा फूल HD+AMOLED देण्यात आलेला आहे. जो 20.9 आस्पेक्ट रेशियो, DC dimming सपोर्ट आणि 120Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. फोनच्या डिसप्लेमध्ये DCI-P3 कलर गेमुटचा 100 टक्के कव्हरेज आणि 91.3 टक्के स्क्रीन-टू-बाडी रेशिया देण्यात आलेला आहे.

कॅमेरा

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात, 50 एमपीचा प्रायमरी सेंसर, 8MP चे अल्ट्रा वाइड अँगल सेंसर आणि 121 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू, 2 MP चा ऑप्टिकल इमेज ऑप्टिमाइजेशनसोबत येणारा मायक्रो शुटर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमरा देण्यात आला आहे.

एडिशनल फीचर्स

Moto G71s 5G मध्ये डॉल्बी सपोर्टसोबत ड्युअल स्टीरियो स्पीकर देण्यात आलेले आहेत. फोनचे माप 7.9 mm इतके आहे.

'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.