मोटोरोलाने लॉंच केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, Android 14 प्रणालीच्या फोनची किंमत तर पाहा
मोबाईल फोन बनविणारी आघाडीची कंपनी मोटोरोलाने नवा बजेट फोन लॉंच केला आहे. या फोनचे फिचर आकर्षक आहेत. शिवाय तो तुमच्या खिशाला परवडेल अशी त्याची किंमत आहे.
मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : मोटोरोलाने भारतात आणखी एक भन्नाट स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन लॉंच केला आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी क्षमतेचा आहे. अँड्रॉइड 14 ऑपरेटींग सिस्टीमसह अनेक तगडे फिचर्स या मोबाईल फोनसोबत मिळणार आहेत. या स्मार्टफोनला काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात लॉंच केले गेले होते. Moto G सिरीजच्या हा स्मार्टफोन प्रिमियम डीझाईनमध्ये आणला आहे. मोटोरोला Moto G04 ची स्पर्धा आता Realme C67, Redmi A3, Infinix Smart 8 या सारख्या बजेट फोनशी होणार आहे. चला तर पाहूयात या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये….
Moto G04 ची किंमत
मोटोरोलाचा हा बजट स्मार्टफोन चार रंगाच्या प्रकारात मिळणार आहे. concord black, sea green, satin blue आणि sunrise orange या रंगात मिळणार आहे. या फोनला दो स्टोरेज व्हेरीएंट्समध्ये खरेदी करता येणार आहे. 4GM RAM + 64 GB आणि 8GB RAM + 128 GB मध्ये खरेदी करता येणार आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 6,999 रुपये असणार आहे. तर याचा टॉप व्हेरीएंट 7,999 रुपयांमध्ये असणार आहे. या स्मार्टफोनला तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट तसेच मोटोरोलाच्या ई-स्टोअर मधून खरेदी करता येईल. या स्मार्टफोनची पहिला सेल 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या पहिल्या सेलमध्ये मोटोरोलाचा बजेट फोनवर 750 रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे.
Moto G04 चे फिचर्स काय ?
या बजेट फोनचे वैशिष्ट्ये जबरदस्त आहेत. यात 6.6 इंचाचा डिस्प्ले स्क्रीन आहे. जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये डॉल्वी एटमसचा सपोर्टही आहे. हा स्मार्ट फोन Unisoc T606 या प्रोसेसरवर काम करतो आहे. यात 8GB पर्यंत RAM सपोर्ट मिळतो. त्यास व्हर्च्युअली 16 GB पर्यंत एक्सपांड करता येईल. यात 128GB पर्यंत इंटरनल स्टोअरेज मिळते. त्यास मायक्रो SD कार्डाद्वारे 1 TB पर्यंत वाढविता येऊ शकते.
एआय कॅमेरा
मोटोरोला ( Moto G04 ) मध्ये 5,000 mAh क्षमतेची बॅटरी सोबत 15w usb type c चार्जिंग फिचर मिळणार आहे. हा स्मार्ट फोन Android 14 ऑपरेटींग सिस्टीमवर काम करतो. या फोनच्या मागचा कॅमेरा 16 MP चा मेन कॅमेरा आहे. हा कॅमेरा AI फिचरचा वापर करतो. तसेच सेल्फी साठी तसेच व्हीडीओ कॉलींगसाठीचा फ्रंट कॅमेरा 5 MP चा देण्यात आला आहे.