9 हजार रुपयांच्या रेंजमध्ये Motorola Moto E40 भारतात लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला मोटो E40 (Motorola Moto E40) भारतात लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये अनेक चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.

9 हजार रुपयांच्या रेंजमध्ये Motorola Moto E40 भारतात लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
Motorola Moto E40
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 4:11 PM

मुंबई : मोटोरोला मोटो E40 (Motorola Moto E40) भारतात लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये अनेक चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या फोनची किंमत 9499 रुपये आहे. फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यात बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. पॉवर बॅकअपसाठी मजबूत बॅटरी आहे. हा मोटोरोला फोन गेल्या आठवड्यात युरोपमध्ये लाँच करण्यात आला आहे. मोटोचा हा किफायतशीर स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, अशी कंपनीला खात्री आहे. चला तर मग या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन, फीचर्स, कॅमेरा, बॅटरी आणि किंमत याबद्दल जाणून घेऊया. (Motorola Moto E40 launched With Triple Rear Cameras, 90Hz Display, know more)

मोटोरोला मोटो E40 हा बजेट फोन भारतात 9,499 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध होईल. या किंमतीत 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज उपलब्ध असेल. तसेच, या फोनचा पहिला सेल फ्लिपकार्टवर 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता होईल. हा मोटोरोला स्मार्टफोन कार्बन ग्रे आणि पिंक क्ले या दोन रंगात येईल.

Motorola Moto E40 चे स्पेसिफिकेशन्स

Motorola Moto E40 हा प्लास्टिक बॉडी असलेला फोन आहे. हा फोन IP 52 सर्टिफिकेशनसह येतो, ज्यामुळे तो स्प्लॅश रेझिस्टन्स बनतो. या फोनमध्ये 6.5 इंचाचे IPS LCD पॅनल आहे, जे 720 x 1600 पिक्सेलसह येते. हा डिस्प्ले 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो, जो स्क्रोलिंग आणि गेमिंग एक्सपीरियन्स सुधारतो.

Motorola Moto E40 चे इतर फीचर्स

इतर बजेट स्मार्टफोन्स प्रमाणे यात 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे. टाइप सी यूएसबी पोर्ट उपस्थित आहे. तसेच, यात बॅक पॅनेलवर फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. यामध्ये गुगल असिस्टंटसाठी स्वतंत्र बटण देण्यात आले आहे.

Motorola Moto E40 रॅम आणि प्रोसेसर

या मोटोरोला स्मार्टफोनमध्ये, UNISOC T700 चिपसेट वापरण्यात आला आहे, क्वालकॉम किंवा मीडियाटेक नाही. तसेच हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित मोटोरोलाच्या My UX UI वर काम करतो. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर हा फोन ड्युअल सिम फोन आहे आणि 4G सपोर्टसह येतो.

Motorola Moto E40 चा कॅमेरा सेटअप

या फोनच्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, या मोबाईल फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल्सचा आहे. सेकेंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सेल सेन्सर आहे आणि तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरला जातो.

इतर बातम्या

108 मेगापिक्सल कॅमेरासह Xiaomi Redmi K50 Pro+ लाँच होणार, जाणून घ्या फोनमध्ये काय असेल खास?

Samsung चा किफायतशीर 5G स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

5000mAh बॅटरी, 4 कॅमरे असलेल्या Samsung च्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांची कपात

(Motorola Moto E40 launched With Triple Rear Cameras, 90Hz Display, know more)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.