जिओचा धमाकेदार प्लॅन, 200 दिवस व्हॅलिडिटी आणि ओटीटी सबस्क्रिप्शनसह मिळवा मोफत 500 जीबी डेटा
तुम्ही Jio वापरकर्ता असाल तर तुम्हाला हा प्लॅन खूप आवडेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 दिवसांची वैधता आणि वापरण्यासाठी एकूण 500 जीबी डेटा मिळतो. याशिवाय तुम्हाला इतर अनेक फायदे मिळतात.

आपण जेव्हा रिचार्ज प्लॅन खरेदी करतो तेव्हा अनेकवेळा आपला गोंधळ उडतो की नेमकी कोणता प्लॅन घ्यावा. अनेक वेळा जुने प्लॅन रिपीट होतात. अशा परिस्थितीत, नवीन प्लॅन , ऑफर आणि फायद्यांचा लाभ घेता येत नाही. म्हणून आम्ही तुम्हाला जिओच्या एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत जो 2,025 रुपयांमध्ये 200 दिवसांची वैधता देतो. या दीर्घकालीन प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक फायदे उपलब्ध आहेत. मोफत एसएमएस आणि ओटीटी सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. या प्लॅनबद्दलची सर्व माहिती आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात…
जिओचा 2025 रुपयांचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 200 दिवसांची वैधता मिळते. 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ चालणाऱ्या या प्लॅन मध्ये एकूण 500 जीबी डेटा मिळतो. यामध्ये तुम्हाला दररोज 2.5 जीबी हाय स्पीड 5जी डेटा वापरण्याची संधी मिळते. याशिवाय, तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मोफत मिळू शकतात. तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय एसएमएसमध्ये चॅट करू शकता. याप्लॅन मध्ये तुम्हाला संपूर्ण मनोरंजन मिळते. तर यात तुम्हाला 90 दिवसांसाठी JioHotstar चे सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. तुम्हाला जिओ क्लाउड स्टोरेजचा अॅक्सेस देखील मिळू शकतो.
JioHotstar आणि Jio Cloud चे फायदे मिळविण्यासाठी, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत Jio नंबरने लॉग इन करावे लागेल. यानंतरच तुम्हाला सर्व फायदे मिळतील.
जिओचा 1029 रुपयांचा प्लॅन
जिओचा हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 168 जीबी डेटा मिळतो. ज्यामधून तुम्ही दररोज 2 जीबी डेटा वापरू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला Amazon Prime Lite चे सबस्क्रिप्शन आणि Jio TV चा ॲक्सेस देखील मिळतो. याशिवाय, तुम्हाला 50 जीबी जिओ क्लाउड स्टोरेज देखील मिळू शकते.
जिओ आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक योजना ऑफर करते. ज्यामध्ये तुम्हाला बरेच फायदे मिळतात. इतर योजनांची संपूर्ण माहिती तुम्ही जिओच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.