एअरटेल, व्हीआयपेक्षाही मुकेश अंबानी यांच्या Jio चा गेमचेंजर प्लॅन, केवळ 1899 रुपयांमध्ये 336 दिवस
Mukesh Ambani Jio Benefits: घरी आणि कार्यालयात वाय-फाय असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तुम्हाला ही योजना अधिक वैधतेसह कमी किमतीत मिळत आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडे सध्या ३३६ दिवसांची वैधता असलेला कोणताही प्लॅन नाही.
Mukesh Ambani Jio Benefits: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओने दूरसंचार मार्केटमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे. स्पर्धक कंपन्यांपेक्षा वेगळे प्लॅन जिओकडून आणले जात आहे. जिओकडून आता एक गेमचेंजर प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये २०० पेक्षा कमी खर्च महिन्याला येणार आहे. ज्यांच्या घरी वायफाय आणि त्यांना जास्त डेटाची गरज नाही, त्यांना हा प्लॅन खूपच फायदेशीर ठरणार आहे. १८९९ रुपयांमध्ये ३३६ दिवस अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तसेच इतर काही फायदेही या प्लॅनमध्ये दिले आहेत. इतर कोणत्याही कंपन्यांकडे अशी योजना नाही.
असा आहे प्लॅन
१८९९ रुपयांमध्ये वर्षभर व्हॅलिडीटी मिळवणारा हा प्लॅन आहे. जिओने या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी फ्री कॉलिंग दिले आहे. तसेच २४ जेबी हायस्पीड डेटाही दिला आहे. ३६०० एसएमएस सुविधा दिल्या आहेत. या प्लॅनमध्ये आणखी काही वेगळे फायदेही दिले आहेत. जिओ टीव्ही, Jio Cinema आणि जिओ क्लाउडचा फ्री एक्सेस दिला आहे. परंतु या प्लॅनसोबत जिओ सिनेमाचा प्रीमियम सब्सक्रिप्शन मिळणार नाही.
वायफोयची सुविधा असणाऱ्यांसाठी योजना
रिलायन्स जिओच्या या १८९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ३३६ दिवसांची वैधता दिली जात आहे. वैधता आणि प्लॅनमध्ये दिला जाणारा डेटा पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की प्लॅनची वैधता खूप जास्त आहे आणि डेटा इतका कमी आहे. परंतु जिओने ही योजना अशा लोकांसाठी आणली आहे, ज्यांचा डेटा वापर कमी आहे.
तुमच्या घरी आणि कार्यालयात वाय-फाय असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तुम्हाला ही योजना अधिक वैधतेसह कमी किमतीत मिळत आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडे सध्या ३३६ दिवसांची वैधता असलेला कोणताही प्लॅन नाही. जिओने ६०१ रुपयांत वर्षभर अनलिमिटेड डेटाची योजना दिली आहे. या योजनेत १२ कुपन दिले जाणार आहे. तुमच्या प्लॅनसोबत ते कुपन वापरल्यावर अनलिमिटेड ५ जी डेटा मिळणार आहे.