‘या’ एका रिचार्जमध्ये 3 महिन्यांसाठी दररोज 2 जीबी डेटा, मोफत Netflix

जिओने एक नवा प्लॅन लाँच केला आहे, ज्याची किंमत १,२९९ रुपये आहे. तर जिओच्या ४८० मिलियन युजर्स या प्लॅनला पसंती देत आहेत.

'या' एका रिचार्जमध्ये 3 महिन्यांसाठी दररोज 2 जीबी डेटा, मोफत Netflix
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 6:26 PM

टेलिकॉम कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओ ही नेटवर्क सेवा देणारी सर्वात मोठी कंपनी आहे. जी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे. रिलायन्स जिओने देशात इंटरनेट वापराच्या क्षेत्रात क्रांती आणली आहे. त्यात दिवाळीनंतर मुकेश अंबानी यांची कंपनी जिओने (JIO) एक नवा प्लॅन लाँच केला आहे. जर तुम्ही जिओच्या पोर्टफोलिओकडे बारकाईने पाहिले तर तुम्हाला असा प्लान सापडेल, ज्याचा रिचार्ज करून तुम्ही ३ महिन्यांसाठी मोफत सुविधा वापराल.

या नव्या प्लॅनची किंमत १,२९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळेल, तसेच अनलिमिटेड कॉल करता येईल आणि नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शनही देखील मिळणार आहे. त्यामुळे जिओच्या ४८० मिलियन युजर्सला हा प्लॅन खूप आवडत आहे. चला जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर

रिलायन्स जिओचा १२९९ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या १२९९ रुपयांच्या नवीन प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. यात तुम्हाला दररोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची खासियत म्हणजे यात ५ जी डेटा सुद्धा देण्यात आला आहे. म्हणजेच तुम्हाला चांगल्या स्पीडने जास्त डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसही दिले जातात.

जिओच्या नवीन प्लॅनचे इतर फायदे

या प्लॅनसोबत नेटफ्लिक्स मोबाइल सब्सक्रिप्शन, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड देखील उपलब्ध आहेत. मात्र या नवीन प्लॅनमध्ये जिओसिनेमाचं सब्सक्रिप्शन देण्यात आलेले नाहीये. तर नेहमीप्रमाणे डेली डेटा संपल्यानंतर इंटरनेटस्पीड ६४ केबीपीएसपर्यंत कमी होईल.

सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरु आहे. त्यात जिओने एक नवीन प्लॅन लाँच केला आहे, ज्यात नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन हे फ्री मध्ये समाविष्ट आहे. यामुळे जिओ केवळ टेलिकॉम कंपनी च नव्हे तर एंटरटेनमेंट कंपनी बनली आहे. टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना कशा प्रकारे खूश ठेवू शकतात, हे अंबानींच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतंय

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.