Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांचे दिवाळी गिफ्ट, 13 हजार देऊन iPhone 16 ची करा खरेदी, काय आहे ही ऑफर?

Reliance Digital offer on iphone 16: आयफोन 16 चा 128GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये आहे. त्यावर रिलायन्स डिजिटलमध्ये पाच हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे.

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांचे दिवाळी गिफ्ट, 13 हजार देऊन iPhone 16 ची करा खरेदी, काय आहे ही ऑफर?
iPhone 16 and
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 11:21 AM

Mukesh Ambani’s Reliance Digital: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आयफोन घेऊ इच्छणाऱ्यांसाठी धमाकेदार ऑफर काढली आहे. आयफोन 16 सप्टेंबर महिन्यात लॉन्च झाला. त्यानंतर मुंबईपासून दिल्लीपर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. आयफोन अ‍ॅमेझॉन अन् फ्लिपकार्ट या ई शॉपिंगच्या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहे. परंतु मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स डिजिटलने आयफोनसाठी दमदार ऑफर मिळत आहे. या ठिकाणी बँक डिस्काऊंटसोबत नो कॉस्ट ईएमआयसुद्धा मिळत आहे.

काय आहे ऑफर

आयफोन 16 लॉन्च झाल्यानंतर खरेदीसाठी अ‍ॅपलच्या चाहत्यांनी गर्दी केली. अ‍ॅपलचा हा सर्वात लेटेस्ट फोन आहे. यामध्ये अनेक नवीन फिचर अ‍ॅपलने जोडले आहे. हा फोन रिलायन्स डिजिटलवरसुद्धा उपलब्ध झाला आहे. आयफोन 16 चा 128GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये आहे. त्यावर रिलायन्स डिजिटलमध्ये पाच हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे.

तुम्ही आयफोन घेण्यासाठी आयसीआयसीआय किंवा कोटक बँकेच्या कार्डचा वापर केला तर तुम्हाला पाच हजाराचे इंस्टेंट डिस्काऊंट मिळणार आहे. त्यानंतर आयफोनची किंमत 74,900 होणार आहे. त्यानंतर ‘नो कास्ट’ ईएमआयचीसुद्धा ऑफर दिले गेली आहे. ही ऑफर सहा महिन्यांसाठी घेतली तर प्रत्येक महिन्याला 12,483 रुपये देऊन आयफोन घेता येणार आहे. म्हणजे पहिल्यांदा फक्त 12,483 रुपये देऊन आयफोन घेऊन जाता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

iPhone 16 का घ्यावा…

iPhone 16 घेणे जुन्या आयफोनपेक्षा अधिक चांगले आहे. यामध्ये अनेक नवीन फिचर्स आहे. त्या A18 चिप दिली गेली आहे. या चिपमुळे फोनच्या वेगात लक्षणीय सुधारणा झाली आहे. बॅटरी जास्त वेळ चालणार आहे. तुम्हाला चांगले फोटो घेता येणार आहे. एकाच वेळी गेम खेळणे, फोटो घेणे अशी अनेक कामे करता येणार आहे. यामध्ये सर्वात चांगले कॅमेरे आहे. तुम्ही या कॅमेऱ्यांचा वापर सहज करु शकतात. त्यात एक बटन आहे, त्यामुळे अनेक कामे सहज होतात. चांगले फोटो अन् व्हिडिओ तुम्ही घेऊ शकतात.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.