अखेर AI मध्ये भारताला कमी समजणाऱ्यांचा अहंकार Mukesh Ambani यांनी उतरवला
Jio Plans to Develop India-Specific AI Models : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या चेअरमननी AI संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. खरंतर मुकेश अंबानी यांच्या वतीने प्रत्येकाला AI ॲक्सेस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. असे केल्याने, त्यांनी सॅम ऑल्टमन याने दिलेले आव्हान स्वीकारले आहे.

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : ChatGPT सारखे AI टूल बनवणे हे भारतीयांसाठी अशक्य आहे असे म्हणत चॅटजीपीटीचे को-क्रिएटर सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी काही महिन्यांपूर्वी भारताला खिजवले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी असा ( AI टूल बनवण्याचा) प्रयत्न केल्यास, तर ते निश्चितच अपयशी ठरतील, असेही ऑल्टमन म्हणाले होते. मात्र आता मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे सॅम ऑल्टमन यांचा अहंकार तोडण्यास सज्ज झाले आहेत. सॅम ऑल्टमन यांचे आव्हान मुकेश अंबानी यांच्या वतीने स्वीकारण्यात आले आहे. रिलायन्सच्या एजीएममध्ये (Annual General Meeting) मुकेश अंबानी यांनी AI संदर्भात मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स जिओ भारतीयांसाठी एक नवी AI सिस्टीम विकसित करेल, जी वापरात असलेल्या ChatGPT सारखीच असेल, असे ते म्हणाले. त्यांच्या बाजूने AI हे प्रत्येकासाठी आणि सर्वत्र उपलब्ध करून दिले जाईल, असा दावा जिओने केला आहे.
ऑल्टमन यांनी उडवली होती खिल्ली
चॅटजीपीटीचे कौतुक करताना ऑल्टमॅन यांनी नुकतेच असे काही वक्तव्य केले होते, जे भारतीयांसाठी अपमानास्पद होते. AI सारखे टूल बनवण्याच्या भारतीय लोकांच्या क्षमतेवरच त्यांनी एकाप्रकारे शंका घेतली होती. मात्र त्यांनतर ऑल्टमन यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
भारताकडे आहे संपूर्ण क्षमता
यासंदर्भात मुकेश अंबानी म्हणाले की, AI टूल विकसित करण्यासाठी भारताकडे संपूर्ण ताकद आणि टेक्नॉलॉजीचे ज्ञानही आहे. Jio Platforms भारतामध्ये AI वर आधारित सोल्यूशन तयार करण्याच्या दिशेने काम करत आहे. त्याद्वारे भारतीय नागरिक आणि (येथील) व्यवसायांना AI चा फायदा मिळू शकेल. भारताकडे क्षमता, डेटा आणि प्रतिभा या तीनही गोष्टी आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुकेश अंबानी यांचे आश्वासन
मुकेश अंबानी म्हणाले की, सुमारे 7 वर्षांपूर्वी जिओने सर्वांनाच इंटरनेट आणि ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्याचे आश्वासन दिले होते. आज जिओ सर्व भारतीयांना AI कनेक्टिव्हिटी देण्याचेही वचन देत आहे.