AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FAU-G गेममध्ये मल्टीप्लेयर मोड मिळणार; अक्षय कुमारची घोषणा

FAU-G: Fearless and United Guards या गेममध्ये मल्टीप्लेअर मोड नसल्याने हा गेम पबजीच्या बरोबरीचा नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं होतं.

FAU-G गेममध्ये मल्टीप्लेयर मोड मिळणार; अक्षय कुमारची घोषणा
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 11:59 AM

मुंबई : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर गेल्या महिन्यात प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) nCore गेम्सने FAU-G हा बॅटल गेम लाँच केला. लाँचिंगनंतर अवघ्या 24 तासात या गेमने एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. 24 तासांत गुगल प्ले स्टोरवरुन तब्बल 1 मिलियन (10 लाख) युजर्सने हा गेम डाऊनलोड केला होता. आतापर्यंत 5 मिलियनहून (50 लाख) अधिक युजर्सनी हा गेम डाऊनलोड केला आहे. PUBG हा गेम भारतात बॅन केल्यानंतर युजर्समध्ये FAU-G गेमबाबत खूप मोठी क्रेझ होती. ही क्रेझ लाँचिंगनंतर समोर आलेल्या डाऊनलोड्सच्या आकडेवारीवरुन पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. दरम्यान, अनेक पबजीप्रेमींना हा गेम आवडला नव्हता, तसेच या गेममध्ये मल्टीप्लेअर मोड नसल्याने हा गेम पबजीच्या बरोबरीचा नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. (Multiplayer Team Deathmatch mode is coming soon in FAUG game)

FAU-G (फियरलेस अँड युनायटेड गार्ड्स) गेम सिंगल प्लेयर मोडसह लाँच करण्यात आला होता. परंतु आता कंपनी लवकरच यामध्ये मल्टीप्लेअर मोड देणार आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने याची पुष्टी केली आहे. अक्षयनेच हा गेम लाँच केला होता. आता अक्षयने स्वतः ट्विटरवर एक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. अक्षयने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “तुमच्या मित्रांना शोधा, स्क्वाड बनवा आणि स्वातंत्र्यासाठी लढा! FAU-G चा मल्टीप्लेयर टीम डेथमॅच मोड लवकरच येतोय.”

कसा आहे सध्याचा सिंगल प्लेअर मोड?

सध्या हा गेम केवळ एकाच मोडवर खेळता येतो. याचाच अर्थ पूर्ण गेमचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल. सध्या या गेममध्ये कॅम्पेन मोड उपलब्ध आहे. या मोडमध्ये भारतीय सैन्यदलाचा एक अधिकारी त्याच्या टीमपासून वेगळा झाला आहे, आणि त्याला शोधण्यासाठी बाकीचे अधिकारी आणि जवान मिशनवर जाणार आहेत.

स्मार्टफोनमध्ये अधिक स्पेसची गरज

तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर हा गेम खेळायचा असेल तर तुमच्या फोनमध्ये किमान 460 एमबी स्पेस असायला हवी. तसेच तुम्हाला या गेमच्या सर्व्हरमध्ये साईन इन करण्यासाठी मोबाइल किंवा वायफाय कनेक्शन/नेटवर्कची आवश्यकता भासेल.

FAU-G कसा डाऊनलोड कराल?

FAU-G हा गेम गुगल प्ले स्टोरवरुन डाऊनलोड करता येईल. परंतु उद्या गेमच्या लाँचिंगपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. गेम लाँच झाल्यानंतर काय-काय करावं लागेल. त्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1. सर्वात आधी गुगल प्ले स्टोर ओपन करा.

2. FAU-G असं सर्च करा.

3. त्यानंतर सर्च रिझल्ट्स दिसतील. त्यामधील पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावरच FAU-G असेल, त्यावर क्लिक करा. (सुरुवातीच्या पर्यायांमध्ये FAU-G गेम दिसला नाही, तर तुम्हाला थोडं स्क्रोल करावं लागेल.

4. गुगल प्ले स्टोरवर गेम इन्स्टॉल करण्यासाठीचं पेज ओपन होईल.

5. इन्स्टॉलचं बटण युजर्सना तेव्हाच दिसेल, जेव्हा कंपनीकडून गेम लाईव्ह केला जाईल.

6. ज्या युजर्सनी या गेमसाठी आधीच प्री-रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांना गेम लाईव्ह होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल. नोटिफिकेशनवर क्लिक करताच युजर्स थेट इन्स्टॉलेशन पेजवर जातील. युजर्स त्याद्वारे गेम इन्स्टॉल करु शकतात.

गुगल प्ले स्टोरवरुन बनावट FauG गेम्स हटवले

हा गेम प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करण्यापूर्वी कंपनीने या नावाचे बनावट गेम्स प्ले स्टोरवरुन हटवले होते. FauG गुगल प्ले स्टोअरवर प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करुन देताना कंपनीने काही गेम प्ले फोटोदेखील शेअर केले आहेत, ज्यावरून या गेमची थीम कशी असणार आहे, याचा आपण अंदाज बांधू शकतो. काही दिवसांपूर्वी या गेमचा एक व्हिडिओ ट्रेलरही शेअर करण्यात आला होता. दरम्यान, या गेमसाठी प्ले स्टोरवर रजिस्टर करणाऱ्या युजर्सना गेम लाँच होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल, त्यानंतर युजर्स गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करुन खेळू शकतील.

संबंधित बातम्या

बॅन झालेल्या PUBG ला पछाडत ‘या’ नव्या गेमचा जगभरात डंका, छप्परफाड कमाई

Made In India गेम्स Pubg ला पछाडणार? पाहा देशातील टॉप-5 गेम्स

PUBG Mobile 2 लाँच होणार? जाणून घ्या कसा असेल नवा गेम

(Multiplayer Team Deathmatch mode is coming soon in FAUG game)

देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार.
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्...
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्....
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष.