तुम्ही रोज वापरत असलेल्या पाच गोष्टीमागे नासाचं डोकं, पाहा काय आहे संशोधन
Nasa Inventeions : नासा ही अंतराळात संशोधन करणारा अमेरिकन संस्था आहे. या संस्थेनं अनेक गोष्टी सर्वसामन्यांसाठी शोधून काढल्या आहेत. या गोष्टींचा वापर आता आपण सर्रास करतो.
मुंबई : नासा ही अंतराळ संशोधन संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अवकाशात घडणाऱ्या घडामोडींचा रोजच्या रोज आढावा घेतला जातो. त्याचबरोबर या संस्थेचा पॉवरफुल रॉकेट, सॅटेलाईट आणि टेलिस्कोप बनवण्यात हतखंडा आहे. अमेरिकनं 1958 साली या संस्थेची स्थापना केली आहे. तेव्हापासून आतापर्यंत या संस्थेनं अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. आजही तितक्याच ताकदीने या संस्थेकडून संशोधन सुरु आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही वापरत असलेल्या काही गोष्टींचा शोध नासानं घेतला आहे. तुम्ही ही यादी वाचली तर नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहाणार नाही. पण अमेरिकेतील नासा या संस्थेमुळेच हा अविष्कार घडला आहे. यामध्ये वायरलेस हेडफोन, डिजिटल इमेज सेन्सर, कॉर्डलेस वॅक्युम क्लिनर, कम्युटर माउस आणि वॉटर प्युअरीफायरचा समावेश आहे.
वायरलेस हेडफोन : नासानं 1961 च्या प्रोजेक्ट मर्करी दरम्यान एका अपघातामुळे वायरलेस हेडफोनची गरज भासली. त्याच वर्षी नासाने पॅसिफिक प्लांट्रोनिक्ससह एम-50 वायरलेस हेडसेट बनवलं. सुरुवातीला हे हेडफोन्स फक्त अंतराळवीर वापरत होते. मात्र यानंतर हे डिव्हाईस सर्वसामान्यांसाठी वापरात आलं. आता आपण याकडे वायरलेस हेडफोन म्हणून पाहतो.
डिजिटल इमेज सेन्सर : जर तुम्ही डिएसएलआर कॅमेरा वापरत असाल तर नासाचे आभार मानायला विसरू नका. कारण जगातील पहिल्या डिजिटल कॅमेऱ्याचा शोध 1975 साली ईस्टमॅन कोडक यांनी लावला होता. मात्र 1960 मध्ये नासाच्या जेट प्रोपल्जन लॅबोरेट्रीमधील इंजिनियर युजीन लॅली यांनी यामागे काम केलं होते. नासाने सुद्धा यावर मोहोर लावली आहे.
कॉर्डलेस व्हॉक्युम क्लिनर : कॉर्डलेस व्हॉक्युम क्लिनर सुद्धा नासाने तयार केला आहे. अपोलो मोहिमेवेळी ब्लॅक अँड डेकर पार्टनरशिपसोबत चंद्रावरील नमुन्यांचा शोध आणि कलेक्शनसाठी बॅटरीवर चालणारं टूल तयार केलं होतं. यात डस्टबस्टर कॉर्डलेस व्हॉक्युम होतं.
कम्प्युटर माऊस : संगणकाचा वापर करताना आपण माऊसचा सर्रास वापर करतो. या माऊसचा शोध नासानं केला आहे. डगलस अँजेलबार्ट यांनी माऊसचा शोध लावला होता. त्यांनीची नासाच्या मदतीने युजर्स फ्रेंडली माऊस डेव्हलोप केला.
वॉटर प्युअरीफायर : हो तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. वॉटर प्युअरीफायरचा शोधही नासानं घेतला आहे. अंतराळवीरांना स्वच्छ पाणी मिळावं या हेतूने वॉटर रिकव्हरी सिस्टम डेव्हलोप केलं होतं. यातील मायक्रोबायल चेक व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे. या माध्यमातून विना पावडर पाणी स्वच्छ केलं जाते.