तुम्ही जर नेटफ्लिक्स वापरत असाल तर या टिप्स आणि ट्रिक्स वापरा; आणि अधिक चांगला अनुभव घ्या
Netflix वर अनेक प्रकारचे व्हिडिओ बघण्याचा आनंद अनेक जण घेत असतात. प्रत्येकाच्या हातात आपल्या आवडीचे व्हिडिओ बघता येत असल्याने अल्पकाळातच हे Netflix हे सगळ्यांच्या परिचयाचे झाले. त्यामुळे अनेक जण त्याचा आनंद घेत असताना काही टेक्निकल समस्या जाणवत असतील तर बघणाऱ्यांचा भ्रमनिरास होतो. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत.
मुंबईः नेटफ्लिक्स पाहताना तुम्हाला प्लॅटफॉर्मवर (Platform) अधिक चांगला अनुभव घ्यायचा असेल, तर नेटफ्लिक्सच्या काही टिप्स (Tips) ट्रिक्स आहेत ज्याद्वारे तुम्ही ही सेवा (Service) अधिक चांगल्या पद्धतीने वापरू शकता. मनोरंजनाच्या क्षेत्रात सध्या सगळ्यात लोकप्रिय आहे ते Netflix. जगातील अनेक भाषांमध्ये Netflix तुम्हाला उपलब्ध आहे. तर भारतातील इतर स्ट्रीमिंगच्या तुलनेत त्याचे महिन्याचे शुल्क जास्त आहे. म्हणून, जर तुम्हाला नेटफ्लिक्स पाहताना ऑप्टिमायझेशन सेटिंग्ज वापरायची असतील किंवा त्या प्लॅटफॉर्मवर अधिक चांगला अनुभव घ्यायचा असेल, तर काही नेटफ्लिक्स टिप्स आहेत त्याद्वारे ही सेवा अधिक चांगल्या प्रकारे वापरू तुम्ही वापरु शकता.
Netflix वर अनेक प्रकारचे व्हिडिओ बघण्याचा आनंद अनेक जण घेत असतात. प्रत्येकाच्या हातात आपल्या आवडीचे व्हिडिओ बघता येत असल्याने अल्पकाळातच हे Netflix हे सगळ्यांच्या परिचयाचे झाले. त्यामुळे अनेक जण त्याचा आनंद घेत असताना काही टेक्निकल समस्या जाणवत असतील तर बघणाऱ्यांचा भ्रमनिरास होतो. त्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत.
Keyboard shortcuts
Netflix डेस्कटॉपवर वापरत असाल तर त्यासाठी तुम्ही शॉर्टकट वापरु शकता. व्हिडिओ थांबविण्यासाठी, किंवा रिवाईंड करण्यासाठीही त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या की वापरु शकता. आवाजासाठी खाली आणि वरील बाजूला दाखवलेल्या चिन्हांचा वापर करा. आणि व्हिडिओ म्यूट करुन बघण्यासाठी M ही की वापरा. तर फुल्ल स्क्रीनसाठी F की परिचय वगळण्यासाठी S वापरू शकता.
Video subtitles
Netflix बघताना तुम्हाला जर सबटायटल बघायचे असतील किंवा त्यावर काय बदल करायचे असतील त्या सबटायटलवर क्लिक करुन ते सेटिंग्ज बदलू शकता. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट, फॉन्टचा आकार आणि स्टाईल निवडू शकता. कलरब्लाईंड दर्शकांसाठी Netflix तुम्हाला विविध रंग निवडू देते.
Data usage
ज्यांना ट्रेन/कार राइड दरम्यान त्यांच्या फोनवर Netflix बघायला आवडते त्यांच्यासाठी ही सेटिंग खूप उपयुक्त ठरणारे आहे. मोबाईल डेटाचा वापर कमी करण्यासाठी Setting> Add>App setting वर जाऊन व्हिडिओ प्लेबॅकवर नेव्हिगेट करू शकता. याव्यतिरिक्त, नेटफ्लिक्स, डीफॉल्ट सेटिंग्ज अंतर्गत, शोमध्ये जाऊन ते भाग डाऊनलोड करता येतात. त्यामुळे तुमचा डाउनलोड सेटअप केवळ वाय-फाय वर बदलून, तुम्ही भरपूर डेटा वाचवू शकता.
Search optimization code
फक्त ‘netflix’ टाइप केल्याने संपूर्ण Netflix मूळ कॅटलॉग समोर येतो. तुम्ही कोड वापरून चित्रपटही शोधू शकता. जे स्मार्ट टीव्ही वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यांना कीबोर्डवर वेगवेगळे शब्द टाईप करताना फुकटचा वेळ वाया घालवावा लागणार नाही. ‘netflix-codes.com’ नावाच्या वेबसाइटला भेट देऊन, तुम्हाला अनेक कोड्समध्ये प्रवेश मिळवता येऊ शकतो.
Audio description
Netflix वर आता दिव्यांग लोकांसाठीही वेगळा पर्याय देण्यात आला आहे. त्यांच्यासाठी ऑडिओ फंक्शन Netflix कडून देण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
50MP कॅमेरा, 18W पॉवर अडॅप्टरसह Realme चा बजेट स्मार्टफोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
WagonR पासून Swift पर्यंतच्या मारुती मॉडेल्सवर 41,000 पर्यंतची सूट; ऑफर फक्त मार्चपर्यंतच…