नेटफ्लिक्स आयफोन यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर सादर करणार गेमिंग अॅप, जाणून घ्या काय आहे कारण

मुलांना गेमिंगपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही सिक्युरिटी पिन देखील वापरू शकता. कंपनीने गेमिंगसाठी BonusXP, Los Gatos सारख्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे. याशिवाय नेटफ्लिक्सने नुकतेच व्हिडिओ गेम निर्माते नाईट स्कूल स्टुडिओ विकत घेतले आहेत. गेमसाठी ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

नेटफ्लिक्स आयफोन यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर सादर करणार गेमिंग अॅप, जाणून घ्या काय आहे कारण
नेटफ्लिक्स आयफोन यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर सादर करणार गेमिंग अॅप
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 6:31 PM

नवी दिल्ली : अनुभवी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix ने या महिन्याच्या सुरुवातीला Android प्लॅटफॉर्मसाठी मोबाइल गेम लाँच केला होता. तसेच, नेटफ्लिक्सने iOS साठी गेमिंग सेवा आणणार असल्याचे सांगितले होते. ब्लूमबर्ग टेक रिपोर्टर मार्क गुरमन यांनी सांगितले की ऍपलचे अॅप स्टोअर धोरण नेटफ्लिक्स गेममध्ये अडथळा आणू शकते कारण एकाच नेटफ्लिक्स अॅपच्या मदतीने गेम खेळले आणि डाउनलोड केले जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की Google Playstore च्या Story ची पॉलिसी iOS च्या पॉलिसीपेक्षा वेगळी आहे.

iOS प्लॅटफॉर्मचे धोरण Google Playstore पेक्षा वेगळे आहे. Apple चे iPhones iOS ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. कंपनीने यूजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक पॉलिसी तयार केली आहे. अशा परिस्थितीत नेटफ्लिक्सला हा गेम iOS च्या अॅप स्टोअरवर उपलब्ध करून द्यावा लागेल. त्यानंतरच यूजर्स त्याचा वापर करू शकतील. Google Playstore प्रमाणे, वापरकर्ते ते थेट Netflix अॅपवर प्ले करू शकत नाहीत. मात्र, याबाबत नेटफ्लिक्सकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

या महिन्याच्या सुरवातीला पाच मोबाईल गेम्स लाँच

नेटफ्लिक्सने या महिन्याच्या सुरुवातीला एक नव्हे तर पाच मोबाइल गेम्स लॉन्च केले आहेत. नेटफ्लिक्सच्या पहिल्या पाच मोबाईल गेम्सची नावे पुढीलप्रमाणे आहेत, पहिला Stranger Things: 1984 (BonusXP), दुसरा Stranger Things 3: The Game (BonusXP), तिसरा Shooting Hoops (Frosty Pop), चौथा Card Blast (Amuzo & Rogue Games) आणि पाचवा आहे Teeter Up (Frosty Pop).

सिक्युरिटी पिनही वापरु शकता

मुलांना गेमिंगपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही सिक्युरिटी पिन देखील वापरू शकता. कंपनीने गेमिंगसाठी BonusXP, Los Gatos सारख्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे. याशिवाय नेटफ्लिक्सने नुकतेच व्हिडिओ गेम निर्माते नाईट स्कूल स्टुडिओ विकत घेतले आहेत.

गेमसाठी ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. गेमिंग सेवेचा आनंद नेटफ्लिक्सच्या सबस्क्रिप्शनमध्येच घेता येईल. नेटफ्लिक्स अॅपमध्ये एक नवीन टॅब आहे, जो गेमिंगचा आहे. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गेम्स दिसतील. हा गेम अँड्रॉइड टॅबलेटवरही खेळता येतो. (Netflix will launch a gaming app on the App Store for iPhone users)

इतर बातम्या

Kamal Haasan: कमल हसन लाँच करणार एनएफटी कलेक्शन, मेटाव्हर्सच्या विश्वातील पहिले भारतीय सेलिब्रिटी

India vs Namibia T20 world cup 2021: विश्वचषकातील भारताचा अखेरचा सामना, नामिबीयाविरुद्ध लढत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.