सरकारी अधिकाऱ्यांसाठी व्हॉट्स अॅपचे देशी व्हर्जन, जाणून घ्या काय आहे खास?
सरकारी अधिकाऱ्यांसाठी व्हॉट्स अॅपचे देशी व्हर्जन, जाणून घ्या काय आहे खास?(New chatting app form government servent)
नवी दिल्ली : भारत सरकारने सरकारी अधिकाऱ्यांसाठी व्हॉट्स अॅपचे खास देशी व्हर्जन आणले आहे. गेल्या वर्षी सरकारने असे अॅप तयार होत असल्याची घोषित केले होते. मात्र आता हे अॅप सरकारी अधिकाऱ्यांसाठी कार्यरत झाले आहे. या अॅपचे नाव Sandes अॅप असे आहे. हे व्हॉट्स अॅपसारखेच अॅप असून चॅटिंगचे देशी व्हर्जन फिचर आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या अॅपचा वापर करण्यास आता सुरुवात केली आहे. गव्हर्नमेंट इन्स्टंट मॅसेजिंग सिस्टम(GIMS) अतिशय सोपे इन्स्टंट मॅसेजिंग अॅप आहे.(New chatting app form government servent)
कुठे मिळेल अॅपबाबत माहिती?
हे अॅप gims.gov.in या साईटवर उपलब्ध आहे. सरकारच्या gims.gov.in या साईटवर गेल्यावर आपल्याला या अॅपबाबत माहिती मिळेल. या अॅपवर लॉग इन कसे करायचे याबाबत साईटवर माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही पर्यायावर टॅप करुन आपण माहिती वाचू शकता. सध्या केवळ सरकारी अधिकाऱ्यांकडे याचे अधिकृत हक्क आहेत. सामान्य जनतेसाठी हे अॅप अद्याप कार्यान्वित करण्यात आले नाही. मात्र लवकरच सामान्य जनतेसाठी हे अॅप कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
काय आहे खास?
प्रायव्हसीच्या दृष्टीने Sandes अॅप फायदेशीर असून व्हॉट्स अपला उत्तम पर्याय ठरेल. Sandes अॅप iOS आणि अँड्रॉईड अशा दोन्ही प्लेटफॉर्मवर काम करते. हे अॅप ऑडिओ आणि डेटा सपोर्ट करते. हे एक आधुनिक चॅटिंग अॅप आहे. या अॅपचे बॅकएंड नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर हँडल करते जे आयटी मंत्रालयाअंतर्गत येते.(New chatting app form government servent)
SBI ग्राहकांसाठी अलर्ट! आताच अपडेट करा ही माहिती नाहीतर ATM होईल बंदhttps://t.co/ErSijQ4wRW#SBICard #SBI #international #Banking
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
इतर बातम्या
75 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री इंटरनेट आणि SMS, Jio चे चार खास प्लान