Jio Plans : रिचार्ज पुन्हा महागले, जिओच्या ग्राहकांना बसणार झटका
जिओने पुन्हा एकदा आपल्या रिचार्जमध्ये वाढ केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच जिओने आपले काही प्लानची किंमत वाढवली होती. त्यानंतर आता आणखी दोन रिचार्ज महागले आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे. जिओने रिचार्ज महाग केल्यांनंतर इतर कंपन्यांनी देखील ते वाढवली होते. आता इतर कंपन्या पुन्हा वाढ करतात का याकडे ग्राहकांचं लक्ष लागलं आहे.
JIO Recharge : जिओकडून वेळोवेळी रिचार्ज प्लॅनच्या किंमती बदलत असतात. रिचार्ज प्लॅन हे यूजर्सना लक्षात घेऊन बदलले जातात. आता पुन्हा एकदा जिओने बदल केला आहे. जिओने प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केले आहेत. हा बदल नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मोफत दिले जात असलेल्या रिचार्ज प्लॅनमध्ये करण्यात आला आहे. रिचार्ज प्लॅनच्या नवीन किमती थेट लागू झाल्या आहेत. Jio वेबसाइट आणि My Jio ॲपवर ते तुम्ही पाहू शकता.
रिचार्जमध्ये पुन्हा एकदा वाढ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स जिओच्या नेटफ्लिक्स प्लानची किंमत 200 ते 300 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. अलीकडेच, जिओने टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. आता पुन्हा एकदा रिचार्ज महागले आहेत. Jio ने याच वर्षी जुलैमध्ये आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केली होती. जिओने रिचार्ज प्लॅनमध्ये १२-२७ टक्के वाढ केली आहे. काही प्लॅनमध्ये असे बदल करण्यात आले होते की यूजर्स अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकत नाहीत. एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज देखील यानंतर महागले आहेत.
नवीन किंमत | जुनी किंमत | Offer | डेटा | फायदे | कालावधी |
1299 | 1099 | Netflix | 2GB/Day | Unlimited Calling, 100 SMS/Day | 84 Days |
1799 | 1499 | Netflix | 3GB/Day | Unlimited Calling, 100 SMS/ Day | 84 Days |
जिओचे रिचार्ज झाले महाग
रिचार्ज प्लॅनच्या किमतीत सुमारे २७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ वार्षिक रिचार्जवर करण्यात आली आहे. 20-21 टक्क्यांपर्यंत ती वाढवण्यात आली आहे. टॅरिफ प्लॅनमध्ये मध्यम श्रेणीतील मोबाइल सेवेचाही समावेश करण्यात आला आहे. रिचार्ज महाग झाल्यानंतर यूजर्सना मोठा धक्का बसला आहे. अनेक यूजर्स बीएसएनएलकडे वळले आहेत. पण यासोबतच जिओही त्यावर सतत काम करत आहे. एअरटेलनेही असाच निर्णय घेऊन रिचार्ज प्लान महाग केल्या होत्या.
जिओने रिचार्ज वाढवताच इतर कंपन्यांनी देखील रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ केली होती. त्यामुळे सगळ्याच कंपन्यांच्या ग्राहकांना झटका बसला होता. जिओ ही आता भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली आहे.