आजपासून बदलणार कॉल करण्याचा नियम, आता ‘0’ लावल्याशिवाय नाही लागणार फोन

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये यासंबंधी नियमावर चर्चा करण्यात आली होती. त्यावर आता हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.

आजपासून बदलणार कॉल करण्याचा नियम, आता '0' लावल्याशिवाय नाही लागणार फोन
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 5:19 PM

नवी दिल्ली : आजपासून कॉलिंगसंबंधी महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे. कारण, आता देशातील सर्व लँडलाइन (Landline) वापरकर्त्यांना मोबाइल फोनवर कॉल करण्याआधी ‘0’ डायल करावा लागणार आहे. दूरसंचार विभागाने (Department of Telecom) याबाबत एक निर्देश जारी केलं आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये यासंबंधी नियमावर चर्चा करण्यात आली होती. त्यावर आता हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. दूरध्वनी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लँडलाईनवरून कोणताही मोबाइल नंबर डायल करण्यापूर्वी आता ‘०’ लावावा लागणार आहे. या निर्णयामुळे सर्व प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनीही आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती देण्यास सुरवात केली आहे. (new rule jio airtel vodafone idea bsnl landline dialing 0 prefixing mobile number from landline compulsory )

टेलिकॉम विभागाने 20 नोव्हेंबर 2020 ला लँडलाईनवरून फोन करण्यासाठी मोबाइल नंबरवर डायलिंग पॅटर्न (Dialing Pattern) संदर्भात एक निर्देश जारी केले होते. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, आता 15 जानेवारीपासून लँडलाईनवरून मोबाइल नंबरवर डायल करण्यापूर्वी ‘0’ लावणं बंधनकारक असणार आहे.

यासंबंधी ग्राहकांना माहिती देण्याचं काम सुरू

दूरसंचार विभागाच्या सूचनेनुसार टेलिकॉम ऑपरेटर्सना या बदललेल्या नियमांची माहिती ग्राहकांना द्यावी लागणार आहे. यामुळे जेव्हा तुम्ही शून्य़ न लावता नंबर डाईल कराल तेव्हा तुम्हाला याबद्दल सूचना देण्यात येणार आहे. मोबाइल ऑपरेटर एअरटेल आणि जिओनेही त्यांच्या ग्राहकांना याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. तर बीएसएनएल आणि व्होडाफोन आयडिया लवकरच ग्राहकांना याबद्दल माहिती देण्यास सुरूवात करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (new rule jio airtel vodafone idea bsnl landline dialing 0 prefixing mobile number from landline compulsory )

संबंधित बातम्या – 

सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेकडून अलर्ट, हा फोन आला तर उचलू नका नाहीतर खातं होईल रिकामं

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता पुन्हा सुरु, किती टक्के वाढ?

(new rule jio airtel vodafone idea bsnl landline dialing 0 prefixing mobile number from landline compulsory )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.