नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून अनेकांच्या WhatsApp वर एक लिंक येत आहे. या लिंकद्वारे मोठा धोका होत असल्याचे आता समोर आले आहे. Rediroff.ru या लिंकच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांची खासगी तसेच वित्तीय माहिती चोरली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Rediroff.ru या लिंकद्वारे बँक तसेच इतर खासगी माहिती मिळवली जात असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले जातेय.
मागील काही दिवसांपासून WhatsApp वर Rediroff.ru ही लिंक फॉरवर्ड केली जात आहे. या लिंकच्या माध्यमातून WhatsApp लोकांची फसवणूक केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये Rediroff.ru लिंकवर जाऊन क्लिक करण्यास सांगण्यात येते. लिंकवर क्लिक केल्यानंतर एका सर्वेच्या माध्यमातून बक्षिस जिंकता येईल असे वापरकर्त्यांना सांगण्यात येते. त्यासाठी काही सोपे प्रश्न विचारले जातात. WhatsApp या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर वापरकर्त्यांना आणखी एका नव्या वेबसाईटवर नेले जाते. तिथे नाव, पत्ता, वय तसेच बँकेचे डिटेल्स तसेच अन्य खासगी माहिती विचारण्यात येते. नंतर याच माहितीचा वापर आर्थिक देवानघेवाणीसाठी करण्यात येत आहे. तसेच ही माहिती डार्क वेबवर विकण्यात येऊ शकते, असे सांगितले जात आहे. याच माहितीचा वापर सायबर गुन्हेगारी विश्वात स्पॅम आणि मालवेअर असलेले मेल पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो. WhatsApp वापरकर्त्यांच्या मोबाईलवर पीयूएदेखील इन्स्टॉल केले जाऊ शकते.
WhatsApp वर युआरएलच्या माध्यमातून Rediroff.ru ही लिंक आली तर त्याला त्वरित स्पॅम म्हणून मार्क करावे. तसेच आपण या लिंकवर चुकून क्लिक केले असेल तर तुमचा मोबाईल तसेच इतर कोणतेही उपकरण अॅडवेअर, मालवेअर तसेच पीयूएसाठी स्कॅन करुन घ्यावे. तसेच प्रलोभण देणाऱ्या कोणत्याही जाहिरातीवर क्लिक करु नये. तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारच्या लिंक आल्यास बाकीचे संदिग्ध अॅप त्वरित अनईन्स्टॉल करावे. यामुळे धोकाधडीपासून स्वत:ला वाचवता येऊ शकते.
इतर बातम्या :