दिल्ली – वाढत्या अपघाताला आळा बसावा, तसेच अपघात झाल्यास जीवीतहानी होऊ नये यासाठी नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. 8 सीट असलेल्या चारचाकी (car) गाड्यांसाठी 6 एअरबॅग (airbag) अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी नुकतीच केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याबाबत याबाबत ट्वीट करत ही माहिती जनतेला दिली आहे.
चारचाकी गाड्यांची सुरक्षितता वाढावी याउद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आठ सीट असलेल्या चारचाकी गाड्यांना सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आले आहे. हा मसुदा नुकताच मंजूर करण्यात आला असून लवकरचं त्याची अंमलबजावणी होईल असंही म्हणटलं आहे. 2019 मध्ये चालक आणि त्याच्या शेजारच्या व्यक्तीसाठी एअरबॅगची व्यवस्था करण्यात आली आहे.
In order to enhance the safety of the occupants in motor vehicles carrying upto 8 passengers, I have now approved a Draft GSR Notification to make a minimum of 6 Airbags compulsory. #RoadSafety #SadakSurakshaJeevanRaksha
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 14, 2022
चारचाकी गाड्यांमध्ये मागच्या आणि पुढच्या प्रवाशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे टक्कर होण्याचं प्रमाण कमी होईल. भारतातील सर्व वाहनांना सुरक्षित बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ट्वीटमध्ये स्पष्ट केले आहे. तसेच 6 एअरबॅगच्या नियमामुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक होईल.
एअरबॅगची संख्या वाढली तर चारचाकी मधील अतिरिक्त एअरबॅगमुळे कारची किंमत प्रति एअरबॅग 3,000 ते 4,000 रुपयांनी वाढेल. समजा रस्त्यात अपघात गरीबांना त्याचा फायदा होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर वाहनांच्या किंमती फक्त 8 ते 9 हजार रूपयांनी वाढेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सध्याची एअर बॅग्सची मुळ किंमत 1800 रूपयांच्या दरम्यान आहे. समजा त्याचं मॉडिफिकेशन करण्यासाठी साधारण 500 रुपयांचा खर्च येईल.