रियल क्रिकेट 20 (Real Cricket 20) : क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे, देशभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी प्ले स्टोरवर एक क्रिकेट गेम उपलब्ध आहे. रियल क्रिकेट 20 (Real Cricket 20) असं या गेमचं नाव आहे. हा गेमदेखील देशात खूप लोकप्रिय आहे. रिअल क्रिकेट 20 हा भारतातील सर्वाधिक डाउनलोड केलेला खेळ बनला आहे. या गेमने मोठ्या संख्येत गेमिंग चाहत्यांना आकर्षित केलं आहे. Google Play Store वर हा गेम 1 कोटीहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आला आहे.