AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nokia 8 एप्रिलला दोन ढासू स्मार्टफोन लाँच करणार, नवे फोन कंपनीचे अच्छे दिन परत आणणार?

नोकिया 8 एप्रिलला एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी X सिरीज, G सिरीजमधील स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

Nokia 8 एप्रिलला दोन ढासू स्मार्टफोन लाँच करणार, नवे फोन कंपनीचे अच्छे दिन परत आणणार?
Nokia smartphone
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 8:00 AM

मुंबई : नोकिया (Nokia) कंपनी 8 एप्रिल रोजी एक मोठा कार्यक्रम आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी X सिरीज, G सिरीजमधील स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. नोकिया जी 10 (Nokia G10), नोकिया जी 20 (Nokia G20), नोकिया एक्स 10 (Nokia X10) आणि नोकिया एक्स 20 (Nokia X20) या स्मार्टफोन्सबाबतची बरीचशी माहिती काही दिवसांपूर्वी लीक झाली होती. 8 एप्रिलच्या इव्हेंटमध्ये कंपनी हे स्मार्टफोन लाँच करु शकते. (Nokia to launch new smartphones on April 8; Nokia G10, G20 and Nokia X10, X20)

नोकियाचे एक्स सिरीज स्मार्टफोन हे बजेट 5 जी फोन असतील. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 SoC सह 5000mAh बॅटरी असेल. तर G10 आणि G20 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. हे फोन 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:30 वाजता लाँच केले जातील. परंतु आतापर्यंत फोनबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. नोकिया जी सिरीजची प्रारंभिक किंमत 11,999 रुपये असू शकते आणि हा हँडसेट ब्लू आणि पर्पल रंगात येईल.

या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल (फीचर्स) बोलायचे झाल्यास, नोकिया जी 10 मध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलियो पी 22 SoC प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तर नोकिया जी 20 मध्ये मीडियाटेक हेलियो जी 35 एसओसी प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हे फोन 3 जीबी आणि 4 जीबी रॅम अशा दोन व्हेरिएंटसह सादर केले जातील. स्टोरेजच्या बाबतीत फोनमध्ये 32 जीबी आणि 64 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात येईल.

या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये आपल्याला क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल जो 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर कॅमेरा, 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सरसह येईल. फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. या फोनची बॅटरी 5000 एमएएच क्षमतेची असेल, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करेल.

Nokia X10 5G, X20 5G ची किंमत आणि स्पेक्स

नोकिया X10 5G ची किमत 25,000 रुपयांच्या आसपास असू शकते. ज्यामध्ये आपल्याला 6 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. त्याचबरोबर नोकिया X20 5G ची किंमत सुमारे 30,000 रुपये असू शकते. या किंमतीत आपल्याला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज पर्याय मिळेल.

आपण जर या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल जो 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरासह येईल. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. हा फोन 4500mAh बॅटरीसह येईल जो 10W चार्जिंगला सपोर्ट करेल.

इतर बातम्या

भारतात OnePlus 9 Pro ची विक्री सुरु, कंपनीकडून शानदार ऑफर

12GB/512GB, 5G कनेक्टिव्हिटीसह Mi 11 सिरीज बाजारात, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

OnePlus 9 ला टक्कर देणाऱ्या Vivo X60 Pro मध्ये काय आहे खास?

(Nokia to launch new smartphones on April 8; Nokia G10, G20 and Nokia X10, X20)

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.