आला रे आला..! Nokia X30 5G स्मार्टफोनची भारतात एन्ट्री, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
नोकियाने भारतीय बाजारात पाय रोवण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. यासाठी नोकियाने नव्या दमाचा X30 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. 20 फेब्रुवारीपासून हा स्मार्टफोन तुम्हाला विकत घेता येईल.
मुंबई : अँड्रॉईडचा जन्म होण्यापूर्वी नोकियाने एक काळ भारतात गाजवला आहे. मात्र वेळेच्या मागे राहिल्याने नोकियाला उतरती कळा लागली. आता पुन्हा एकदा नोकिया मार्केटवर पकड मिळवण्यासाठी धडपड करत आहे. एचएमडी ग्लोबलने भारतात Nokia X30 5G स्मार्टफोन विक्रीची घोषणा केली आहे. 20 फेब्रुवारीपासून भारतात विक्री सुरु होणार आहे. नोकिया मोबाईल इंडियाने Nokia X30 5G फोनबाबत ट्वीट करून माहिती दिली. नोकिया एक्स 30 5जी हा स्मार्टफोन कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बर्लिनच्या आयएफए 2022 मध्ये लाँच केला होता. तेव्हापासून भारतीय मोबाईलप्रेमी या फोनच्या प्रतिक्षेत होते.या स्मार्टफोनची किंमत 48,999 रुपये इतकी आहे. मोबाईलची प्री बुकिंग सुरु झाली असून क्लाउडी ब्लू आणि आईस व्हाईट रंगात खरेदी करू शकता. कंपनी Nokia X30 5G इको-फ्रेंडली स्मार्टफोन असल्याचं सांगत आहे. 100% पुनर्नवीनीकरण अॅल्युमिनियम आणि 65% पुनर्नवीनीकरण प्लास्टिकपासून तयार करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन तीन वर्षांच्या ओएस अपडेट,3 वर्षांच्या सिक्युरिटी पॅच आणि 3 वर्षांच्या वॉरंटीसह येत आहे.
Nokia X30 5G स्मार्टफोनमध्ये काय आहे खासियत
नोकिया एक्स30 5जी मध्ये 8 जीबी रॅमचा स्नॅपड्रॅगन 695 5जी प्रोसेसर आहे. हा फोन अँड्रॉईड 12 वर आधारित आहे. तसेच 6.43 इंचाची फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्ले रिफ्रेस रेड 90Hz आणि ब्राइटनेस 700 निट्स आहे. डिस्प्ले खराब होऊ नये यासाठई गोरिल्ला ग्लास विक्टसचं प्रोटेक्शन आहे.त्याचबरोबर 50 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.प्रायमरी लेंस 50 मेगापिक्सलची आहे. तसेच प्युओरव्यू ओआयएसला सपोर्ट करतो. दुसरी कॅमेरा लेंस 13 मेगापिक्सलची आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Introducing Nokia X30 5G, with low light imaging, FHD+ AMOLED display, 3 years of Android OS and security updates and a body made of recycled aluminium. #PlayTheLongGame Pre-book now: https://https://t.co/Sq1D9ODxhE pic.twitter.com/s6VaQM3Yxe
— Nokia Mobile India (@NokiamobileIN) February 15, 2023
- 6.43″ 90Hz AMOLED display
- 8GB RAM + 256GB storage
- Qualcomm Snapdragon 695
- 50MP + 13MP rear camera
- 33W 4,200mAh battery
फोनमध्ये 4200 एमएएचची बॅटरी असून 33 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटीसाठी नोकिया फोनमध्ये 5G,Wifi802.11a/b/g/n/ac/ax, ब्लूटूथ 5.1, NFC, GPS/AGPS, GLONASS, Beidou आणि टाईप सी पोर्ट आहे. फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तसेच वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपी67 रेटिंगपण मिळाली आहे.