VI 5G आहे, पण नेटवर्क स्पीड नाही? ‘या’ ३ सोप्या सेटिंग्ज बदलून बघा झपाट्यानं वाढेल इंटरनेट!
जर तुम्ही Vi चे ग्राहक असाल आणि 5G चा अनुभव घेण्यास उत्सुक असाल पण अडचणी येत असतील, तर घाबरू नका. फक्त तुमच्या फोनमधील या तीन गोष्टी तपासा आणि तुमच्या फोनवर Vi 5G सुसाट चालताना बघा!

वोडाफोन-आयडिया (Vi) कंपनीने अखेर आपल्या 5G नेटवर्कची सेवा भारतात सुरू केली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ही सेवा सुरू झाली असून आता कंपनी दिल्ली, पंजाब, बिहार, कर्नाटक अशा विविध राज्यांमध्ये 5G नेटवर्क पोहोचवण्यासाठी तयारी करत आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाची ही टेलिकॉम कंपनी आता पुन्हा मार्केटमध्ये आपलं स्थान मजबूत करण्याच्या तयारीत आहे.
पण अनेक ग्राहक Vi 5G नेटवर्क वापरत असताना सांगत आहेत की, त्यांना अजूनही 4G सारखाच स्पीड मिळतोय. काहींना तर फोनमध्ये 5G नेटवर्क दिसतं, पण इंटरनेटचा वेग वाढलेला जाणवत नाही. ही समस्या खूप लोकांना भेडसावत आहे. पण यावर Vi कंपनीनेच काही सोपे उपाय दिले आहेत, जे वापरून तुम्ही तुमचं 5G अनुभव नक्कीच सुधारू शकता.
1. ‘Power Saving Mode’ बंद करा :




अनेक वेळा आपण बॅटरी वाचवण्यासाठी फोनमध्ये Power Saving Mode चालू ठेवतो. पण Vi च्या मते, हा मोड चालू असेल तर तो 5G नेटवर्कच्या स्पीडवर परिणाम करतो. त्यामुळे, जर तुम्हाला खरा 5G स्पीड अनुभवायचा असेल, तर हा मोड बंद ठेवणं गरजेचं आहे.
2. Vi सिम कार्ड Slot 1 मध्ये ठेवा :
अनेक फोनमध्ये दोन सिम स्लॉट असतात. Vi ने सांगितलं आहे की 5G सेवा नीट चालण्यासाठी Vi सिम कार्ड नेहमी Slot 1 मध्येच असावं. जर तुमचं सिम दुसऱ्या स्लॉटमध्ये असेल, तर ते Slot 1 मध्ये टाका आणि नंतर नेटवर्क तपासा.
3. फोन गरम झाला आहे का बघा :
जर फोन खूप वेळ वापरला असेल किंवा चार्जिंगवर असेल, तर तो गरम होतो. अशा वेळी नेटवर्क नीट काम करत नाही. फोन थोडा थंड झाल्यावर 5G स्पीड पुन्हा सुधारतो.
एक चांगली गोष्ट म्हणजे Vi आणि Airtel दोघंही एकसारखं 5G तंत्रज्ञान वापरतात. त्यामुळे जर तुमच्या फोनमध्ये Airtel 5G चालत असेल, तर Vi 5G पण चालायला हवं. फक्त वरील गोष्टी तपासा आणि मग तुम्ही पण 5G चा मस्त स्पीड एन्जॉय करू शकता!