आता पबजी मोबाईलमध्ये लुटा टेस्लाच्या कारचा आनंद; जाणून घ्या कसा करायचा वापर

इलेक्ट्रिक व्हेईकल जायंट टेस्ला आणि पबजी मोबाईलने काही दिवसांपूर्वी भागीदारी केली होती, त्यामध्ये टेस्ला प्रोडक्ट्सला पॉप्युलर व्हिडिओ गेम दाखवण्याची बाब नमूद करण्यात आली होती.

आता पबजी मोबाईलमध्ये लुटा टेस्लाच्या कारचा आनंद; जाणून घ्या कसा करायचा वापर
आता पबजी मोबाईलमध्ये लुटा टेस्लाच्या कारचा आनंद; जाणून घ्या कसा करायचा वापर
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 3:43 PM

नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनमध्ये मुले घरामध्ये राहून कंटाळली आहेत. त्यांच्या हातामध्ये सतत मोबाईल राहत आहे. पालकही मुलांवर किती वेळ लक्ष ठेवायचा, असा विचार करून मुलांना गेम खेळण्यास मुभा देत आहेत. मुलांचा मोबाईल गेमकडे वाढलेला कल लक्षात घेत विविध कंपन्या व्हिडिओ गेम उपलब्ध करण्यात पुढे सरसावल्या आहेत. याचदरम्यान पबजी मोबाईलने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे आता पबजी मोबाइलमध्ये टेस्ला कारचा आनंद लुटता येणार आहे. (Now enjoy the Tesla car in Pubji Mobile; know how to use)

जायंट टेस्ला आणि पबजी मोबाईलमध्ये भागीदारी

इलेक्ट्रिक व्हेईकल जायंट टेस्ला आणि पबजी मोबाईलने काही दिवसांपूर्वी भागीदारी केली होती, त्यामध्ये टेस्ला प्रोडक्ट्सला पॉप्युलर व्हिडिओ गेम दाखवण्याची बाब नमूद करण्यात आली होती. पबजी मोबाइलने अलीकडेच आपला 1.5 अपडेट रिलिज केला आहे. तसेच ईवी मेकर्ससोबत भागीदारीची घोषणा केली आहे. यावेळी जाहीर करण्यात आले आहे की, टेस्लाच्या प्रोडक्ट्सना गेममध्ये सामील करण्यात आले आहे.

अपडेटेड पबजी मोबाईल गेममध्ये टेस्ला गिगाफॅक्टरी, टेस्ला मॉडेल वाय इलेक्ट्रिक वाहन आणि त्याचे वेगवेगळ्या ड्राइव्हंग फीचर्स व टेस्ला सेमी सेल्फ-ड्राइविंग वाहन दाखवले जाऊ शकते. गेमर्स मॅपवर टेस्ला फॅक्टरीपर्यंत पोहोचू शकतात आणि टेस्ला मॉडेल वाय वाहन बनव्यासाठी फॅक्टरीच्या असेंबली लाइनमध्ये सर्व स्विच ऍक्टिव्ह करणे शक्य आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक कारमध्ये स्वयंचलित मोडला हायवेवर ऍक्टिव्हेट केला जाऊ शकतो. हे खेळाडूंना स्वयंचलितरित्या राजमार्गसह पूर्व-सेट मार्कर्सचा लोकेशनवर घेऊन जाते.

टेस्ला काही वर्षापासून इलेक्ट्रिक वाहनांमध्ये व्हिडिओ गेम पोर्ट करतेय

टेस्लाचे सेमी सेल्फ-ड्रायविंग वाहन अचानक वाईल्ड रोडवर दिसेल तसेच काही विशेष मार्गांवर ऑटोमेटिक चालू शकेल. खेळाडू या कारचे नुकसान करून आणि त्यांना ड्रॉप सप्लाय क्रेट बनवून युद्ध सामग्री प्राप्त करू शकतात. टेस्ला गेल्या काही वर्षांपासून आपल्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये व्हिडिओ गेम पोर्ट करीत आहे. त्याचबरोबर कंपनी आपल्या वाहनांमध्ये एक व्हिडिओ गेम प्लेटफॉर्म टेस्ला आर्केडदेखील निर्माण करीत आहे. ईव्ही मालकांना मनोरंजनासह इतर सुविधा प्रदान करण्याबरोबरच कंपनी व्हिडिओ गेम स्टूडियोसोबत काम करत आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी याबाबत संकेत दिले आहेत. जेव्हा कार स्वत: चालेल, त्यावेळी मनोरंजन एक प्रमुख भूमिका निभावेल, असे मस्क यांनी म्हटले आहे.

आता परिस्थिती बदलली आहे आणि टेस्ला स्वत:चा एक व्हिडिओ गेमचा भाग बनली आहे. तथापि टेस्ला कंपनीने याआधीही पबजी मोबाइल गेमचा चायनीज व्हर्जन ‘गेम ऑफ पीस’मध्ये अशा प्रकारचा इंटीग्रेशन केले आहे. यात एक विशेष बाब ही आहे की, पबजी टेस्ला कंपनीमध्ये मोठी शेअरधारक आहे. (Now enjoy the Tesla car in Pubji Mobile; know how to use)

इतर बातम्या

मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते; पंकजा मुंडेंचा भाजपवर अप्रत्यक्ष वार

दुर्मीळ मगरीच्या सात जिवंत पिल्लांची तस्करी, ठाण्यात आरोपीला अटक

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.