Water making machine | आता घरबसल्या हवेतून करा पाण्याची निर्मिती, एअर वॉटर मेकिंग मशीन लाँच
इस्रायली कंपनी असलेल्या वॉटरजेनने भारतात AWG प्रोडक्ट लाँच केले आहेत. याच्या मदतीने हवेतून पाणी तयार करता येणे शक्य होणार आहे. यासह त्यांची अनेक उत्पादने याआधी भारतात लाँच झाली आहेत.
तुम्हाला जर कोणी सांगितले, की आता घर बसल्या हवेच्या माध्यमातून पिण्यासाठीचे शुध्द पाण्याची निर्मिती करता येणार आहे, तर तुम्ही समोरच्याला वेड्यात काढाल. परंतु आता हे सर्व कल्पोकल्पित नाही तर अगदी खरं आहे. इस्रायली टेक्नोलॉजीमुळे आता हे शक्य होणार आहे. इस्त्रायली कंपनी वॉटरजेननेही (Watergen) याची मशीन भारतात आणली आहे. यासाठी कंपनीने एसएमव्ही जयपूरिया ग्रुप (SMV Jaipuria Group)सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीसह, कंपनी भारतात अनेक श्रेणींमध्ये Atmospheric Water Generators (AWG) उत्पादने आणणार आहे. हे यंत्र परिसरातील हवेतून मिनिरल्स सुरक्षित पिण्याचे पाणी तयार करणार आहे.
विविध सिरीजचा समावेश
मशिनबाबत कंपनीने असे म्हटले आहे, की ते ऑपरेशन सुरू झाल्यापासून एक वर्षाच्या आत भारतात मॅन्यूफॅक्चर युनिटची सुरुवात करणार आहेत. कंपनीने वॉटरजेन उत्पादनांची वाइउ रेंजदेखील समोर आणली आहे. यामध्ये Genny, Gen-M1, Gen-M Pro आणि Gen-L यांचा समावेश आहे. या उत्पादनांची क्षमता दररोज 30 लीटर ते 6,000 लीटरपर्यंत असते. कंपनीने सध्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. याची किंमत 2.5 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते, असे मानले जात आहे. कंपनीने सांगितले की, ही उत्पादने शाळा, रुग्णालये, उद्याने, घरे, कार्यालये, रिसॉर्ट्स, बांधकाम साइट्स, गावे, निवासी इमारती आणि इतर ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे. हवेतील आर्द्रतेचा वापर करून मशिनव्दारे पाण्याची निर्मिती केली जाते.
सुरक्षित पिण्यायोग्य पाणी
या उपकरणात प्लग अँड प्ले टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ही मशीन आपल्याला कोणत्याही वीज कनेक्शनसह किंवा कोणत्याही पर्यायी ऊर्जा स्त्रोतासह बसविण्याची परवानगी असणार आहे. या प्रोडक्टबाबत अधिक माहिती देताना वॉटरजेन इंडियाचे सीईओ मायन मुल्ला म्हणाले की, त्यांना सर्वांसाठी सुरक्षित मिनिरलाइज पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करुन द्यायचे आहे. मुल्ला पुढे म्हणाले की पेटंट केलेल्या GENius तंत्रज्ञानासह, त्यांना भारतातील औद्योगिक आणि ग्राहकांची मागणी चांगल्या पाण्याच्या गुणवत्तेसह पूर्ण करायची आहे. SMV जयपूरिया ग्रुपचे संचालक चैतन्य जयपुरिया म्हणाले की, भारतातील बहुतेक लोकांना स्वच्छ आणि नैसर्गिक पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. हे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान त्यांच्यासाठी गेम चेंजर सोल्यूशन ठरणार असल्याचा विश्वास आहे.