iPhone 15 Pro : चांगभलं! आयफोन 15 चे चटके नाही बसणार, Apple करणार हा बदल

iPhone 15 Pro : अखेर ॲप्पलने iPhone 15 Pro मध्ये ओव्हरहिटिंगचा विषय असल्याचे मान्य केले. तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर ॲप्पलने स्मार्टफोन कशामुळे गरम होत आहे, याची माहिती दिली. त्यांनी यापूर्वी तज्ज्ञांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. लवकरच ओव्हरहिटिंगची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

iPhone 15 Pro : चांगभलं! आयफोन 15 चे चटके नाही बसणार, Apple करणार हा बदल
Follow us
| Updated on: Oct 01, 2023 | 4:29 PM

नवी दिल्ली | 1 ऑक्टोबर 2023 : अखेर ॲप्पलने iPhone 15 Pro गरम होत असल्याच्या तक्रारींवर मौन सोडले. युझर्संनी तक्रारींचा पाऊस पाडल्यानंतर ओव्हरहिडिंगच्या विषयावर कंपनीकडून प्रतिक्रिया आली आहे. कंपनीने याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. काही युझर्सने iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max या मॉडेलचे तापमान वाढल्याचे समोर आणले होते. व्हिडिओ शूट करुन युट्यूबला अपलोड करण्यात आले. त्यामध्ये या आयफोनचे तापमान 46 डिग्री सेल्सिअसने वाढल्याचे समोर आले. प्रकरणात पहिल्यांदाच ॲप्पलने मौन सोडले आणि लवकरच ओव्हरहिटिंगची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.

काय म्हणाले ॲप्पल

तंत्रज्ञानातील या बाप कंपनीने या दोन मॉडेलमध्ये ओव्हरहिटिंगचा मुद्दा असल्याचे मान्य केले. तज्ज्ञांनी या स्मार्टफोनचे डिझाईन, त्याची टिटानियम फ्रेम, थर्मलचा वापर यामुळे मोबाईल गरम होत असल्याचा दावा केला होता. पण कंपनीने हे दावे खोडून काढले आहे. कंपनीने हा मुद्दा लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. नवीन दोन मॉडेलचे वाजवीपेक्षा अधिक तापमान असल्याचे आमच्या पण लक्षात आले आहे, असे कंपनीने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.

हे सुद्धा वाचा

मग कारण तरी काय

कंपनीच्या म्हणण्यानुसार, डिव्हाईस पहिल्यांदाच सेटअप करताना अथवा रिस्टोअर होताना ही समस्या येत आहे. बँकग्राऊंडमधील काही गोष्टी स्मार्टफोनचे तापमान वाढवत आहेत. काही युझर्सच्या आयफोनला ही समस्या भेडसावत आहे. iOS 17 शी संबंधित एका बगमुळे आयफोन गरम होत आहे. वापरकर्त्यांनी सोशल मीडिया, कंपनीकडे या तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर कंपनीची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

अशी सूटणार समस्या

ॲप्पलच्या iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये युझर्सला ओव्हरहिटिंगची समस्या (Overheating Issue) जाणवत आहे.मोबाईल गरम होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. ग्राहकांच्या नाराजीनंतर तज्ज्ञांनी या स्मार्टफोनमधील काही बदलांमुळे ही समस्या आल्याचे भाकित केले होते. पण कंपनीने एका बगमुळे ही समस्या आल्याचे सांगत, ही तक्रार दूर करण्याचे आवश्वासन दिले आहे. त्यासाठी कंपनी सॉफ्टवेअर अपडेट करणार आहे. युझर्सला त्यांच्या स्मार्टफोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर ही समस्या दूर होईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.