आता चार्जिंग पॅडशिवाय फोन होणार चार्ज, ओप्पोची नविन टेक्नोलॉजी

आता चार्जिंग पॅडशिवाय फोन होणार चार्ज, ओप्पोची नविन टेक्नोलॉजी (Now the phone will be charged without a charging pad, Oppo's new technology)

आता चार्जिंग पॅडशिवाय फोन होणार चार्ज, ओप्पोची नविन टेक्नोलॉजी
आता चार्जिंग पॅडशिवाय फोन होणार चार्ज
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 6:43 PM

मुंबई : प्रत्येक स्मार्टफोन निर्माता कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आधुनिक टेक्नोलॉजी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशीच नविन टेक्नोलॉजी स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो घेऊन आली आहे. आगामी काळात फोनला कोणतेही चार्जर न जोडता फोन चार्ज करता येणार आहे. यासाठी फोन वायरलेस पॅडवर ठेवण्याची गरज भासणार नाही. चीनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोने नवीन वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान सादर केले आहे. याला ट्रू वायरलेस चार्जिंग असे म्हटले जाऊ शकते. कारण यासाठी आपल्याला फोन कोणत्याही डॉकवर ठेवण्याची आवश्यकता नाही. (Now the phone will be charged without a charging pad, Oppo’s new technology)

कंपनीने जारी केला व्हिडिओ

याबाबत अधिक माहिती देणारा व्हिडिओ कंपनाने जारी केला आहे. मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस-शांघाय (एमडब्ल्यूसीएस) 2021 मध्ये कंपनीने हा 30 सेकंदाचा व्हिडिओ सादर केला आहे. ओप्पोने दिलेल्या माहितीनुसार या व्हिडिओमध्ये नवीन वायरलेस टेक्नोलॉजी कॉन्सेप्ट फोन Oppo X 2021 सह दाखवले आहे. ही स्मार्टफोन कॉन्सेप्ट कंपनीने याआधीही सादर केली होती. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, Oppo X 2021 स्मार्टफोनला वायरलेस चार्जिंग मॅटवर चार्जिंग केले जात आहे. मॅटवरुन फोन उचलल्यानंतरही लगातार चार्जिंग होत आहे. याला वायरलेस एअर चार्जिंग टेक्नोलॉजी म्हटले आहे.

कशी असेल नवी चार्जिंग टेक्नोलॉजी

ओप्पोने दिलेल्या माहितीनुसार वायरलेस एअर चार्जिंग 7.5W पर्यंत पावर देईल. ही चार्जिंग मॅट 10 सेमीच्या रेंजपर्यंत डिव्हाईसला चार्ज करु शकते. तथापि यावर्षी जानेवारीमध्ये चीनी कंपनी शाओमीनेही हवाई चार्जिंग तंत्रज्ञानाबद्दल सांगितले होते. शाओमीचे हवाई चार्जिंग तंत्रज्ञान 5W ची पावर देते. याशिवाय फोनला काही मीटर अंतरापर्यत कोणत्याही दिशेने हवेमध्ये चार्ज करता येईल. मात्र शाओमीने हे सांगितले नाही की, कंपनी ही नवी टेक्नोलॉजी आपल्या युजर्ससाठी कधी बाजारात आणणार आहे.

शाओमीची नवी सिरीज लवकरच

मिळालेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच नवीन Find X3 सीरीज स्मार्टफोन्स लाँच करु शकते. यात Find X3 Pro, Find X3, and Find X3 Lite आणि Neo स्मार्टफोन्सचा समावेश असेल. टिपस्टर जॉन प्रोसरच्या म्हणण्यानुसार 11 मार्च रोजी या स्मार्टफोनची घोषणा केली जाऊ शकते आणि 14 एप्रिलला लाँच केले जाऊ शकते.

सध्या एअर चार्जिंग किंवा विना टच डिव्हाईस चार्ज करण्याची कन्सेप्ट लोकांपर्यंत येण्यास वेळ लागेल. कारण हे अद्याप टेस्टिंग फेजमध्ये आहे आणि जेव्हा हे पूर्ण वर्किंग होईल तेव्हाच कंपन्या ही टेक्नोलॉजी ग्राहकांसाठी उपलब्ध करतील. (Now the phone will be charged without a charging pad, Oppo’s new technology)

इतर बातम्या

Narzo 30A सह Realme चा सर्वात स्वस्त 5G फोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

शानदार ऑफर! 4 लाखांहून अधिक किंमत असलेली कार अवघ्या 2.15 लाख रुपयांमध्ये खरेदी करा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.