Elon Musk याने मुलाचे नाव ठेवले ‘शेखर’, भारतीय नाव ठेवण्यामागे हे आहे कारण
Elon Musk | टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी त्यांच्या एका मुलाचे नाव 'शेखर' ठेवले. या भारतीय नावामुळे जगभरात कौतुक आणि नवल करण्यात येत आहे. विचाराअंती मस्क याने हे नाव ठेवले आहे. अनेक जण परदेशी नावाशी साधार्म्य ठेवणारी नावं ठेवत असताना मस्क याने एक नवीन पायंडा पाडला आहे. त्यामागील कारण तुम्हाला भारतीय म्हणून नक्कीच अभिमानास्पद आहे.
नवी दिल्ली | 3 नोव्हेंबर 2023 : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क हा सातत्याने चर्चेत राहतो. एक्स, टेस्ला, स्पेसएक्स अशा कंपन्यांचा तो मालक आहे. तो धनकुबेर आहे. पण त्याच्या खासगी आयुष्याविषयी फार क्वचित माहिती समोर येते. आता त्याच्या कुटुंबाविषयी एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, मस्क याच्या जुळ्या मुलांपैकी एकाचे नाव त्याने शेखर असे ठेवले आहे. या भारतीय नावाने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. भारतीय नावच का ठेवले, याविषयीचा खुलासा मस्क यानेच केला आहे. त्यामुळे तुमचे ऊर नक्कीच भरुन येईल. मस्क याच्या अनेक प्रयोगातील हा नावाच प्रयोग तुम्हाला नक्की भुरळ घालेल.
अशी आली माहिती समोर
इंग्लंडमध्ये सध्या AI सुरक्षेशी संबंधित एक संमेलन सुरु आहे. यामध्ये भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर हे पण सहभागी झाले आहेत. त्यावेळी त्यांची एलॉन मस्क याच्यासोबत भेट झाली. या भेटीदरम्यान मस्क यांनी त्यांना त्यांच्या मुलांविषयी माहिती दिली. मस्क यांनी त्यांच्या मुलांच्या नावाविषयी चंद्रशेखर यांना माहिती दिली, त्यावेळी त्यांना सुखद धक्का बसला.
एक्सवर दिली माहिती
Look who i bumped into at #AISafetySummit at Bletchley Park, UK.@elonmusk shared that his son with @shivon has a middle name “Chandrasekhar” – named after 1983 Nobel physicist Prof S Chandrasekhar pic.twitter.com/S8v0rUcl8P
— Rajeev Chandrasekhar 🇮🇳 (@Rajeev_GoI) November 2, 2023
राजीव चंद्रशेखर यांनी मस्क याच्या भेटीचा वृत्तांत सोशल मीडियावर कथन केला. एलन मस्क आणि त्याची गर्लफ्रेंड शिवोन यांच्या मुलाचे नाव शेखर असल्याचा खुलासा मस्क याने त्यांच्याकडे केल्याची माहिती चंद्रशेखर यांनी दिली. मस्क आणि शिवोन यांना जुळं मुलं आहेत. त्यातील एकाचं नाव चंद्रशेखर असं आहे. हे समजताच राज्यमंत्री चंद्रशेखर यांना आनंद झाला. त्यांनी याविषयीची माहिती सार्वजनिक केली.
भारतीय नाव ठेवण्यामागील कारण
राजीव चंद्रशेखर यांनी X वर एक पोस्ट लिहिली आहे. त्यानुसार, मस्क यांनी त्यांना सांगितलं की, शिवोन यांच्याकडून त्यांना दोन मुलं आहेत. त्यातील एकाचे नाव “चंद्रशेखर” आहे. भारतीय नोबेल भौतिक वैज्ञानिक प्राध्यापक एस. चंद्रशेखर यांच्या नावावरुन हे नाव ठेवण्यात आले आहे. राजीव चंद्रशेखर यांनी याविषयीचे ट्विट केल्यानंतर त्यावर शिवोन हिने पण प्रतिक्रिया दिली आहे. शिवोन हिने ही बाब खरी असल्याचा दुजोरा दिला आहे. सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांचा सन्मान म्हणून हे नाव ठेवल्याचे तिने स्पष्ट केले. मस्क आणि शिवोन यांनी अद्याप लग्न केलेले नाही.