OnePlus 10 Pro मध्ये 12GB रॅम, 32MP सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता, जाणून घ्या डिटेल्स

OnePlus 10 Pro हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच लॉन्च होईल. अद्याप या स्मार्टफोनच्या लॉन्च डेटचा खुलासा करण्यात आलेला नाही, परंतु 4 जानेवारी रोजी याचे डिटेल्स समोर येतील.

OnePlus 10 Pro मध्ये 12GB रॅम, 32MP सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता, जाणून घ्या डिटेल्स
oneplus (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 6:00 AM

मुंबई : OnePlus 10 Pro हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच लॉन्च होईल. अद्याप या स्मार्टफोनच्या लॉन्च डेटचा खुलासा करण्यात आलेला नाही, परंतु 4 जानेवारी रोजी याचे डिटेल्स समोर येतील. OnePlus ने या आगामी डिव्हाइससाठी नोंदणी करणे सुरू केले आहे. डिव्हाइस बेंचमार्किंग वेबसाइटवर दिसत आहे. सर्वात अलीकडील लीक्समध्ये, मॉडेल क्रमांक NE2210 असलेले डिव्हाइस Geekbench पाहायला मिळाले आहे. टिपस्टरनुसार, हे डिव्हाइस OnePlus 10 Pro आहे. (OnePlus 10 Pro may come with 32MP selfie Camera and 12GB Ram, specs leaked before its launch)

लिस्टेड डिव्हाइस 976 च्या सिंगल कोर स्कोअरसह आणि 3469 च्या मल्टी-कोर स्कोअरसह येते. यासोबत, हे डिव्हाइस 12 GB रॅम, स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 1 चिपसेट आणि Android 12 OS सह लाँच होऊ शकतं. हा स्कोअर OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro च्या 1,100+ आणि 3,600+ स्कोअरपेक्षा कमी आहे. OnePlus 10 Pro मध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले मिळेल, जो 2K (2 हजार रिझोल्यूशन) सह बाजारात दाखल होईल. यात 120Hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळेल, जो गेमिंग आणि स्क्रोलिंग अनुभव सुधारतो. यात LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनमध्ये एक सिंगल होल कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो वरच्या डाव्या बाजूला आहे.

वनप्लस 10 प्रो मधील संभाव्य कॅमेरा सेटअप

डिजिटल चॅट स्टेशननुसार, या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यापैकी प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल, तर सुपर वाईड अँगल कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल, तिसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे, जो 3X झूमसह सादर केला जाईल. यात सेल्फीसाठी 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

वनप्लस 10 प्रो मधील बॅटरी आणि चार्जिंग क्षमता

OnePlus 10 Pro च्या फास्ट चार्जिंगबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन चार्ज करण्यासाठी 80W वायर फ्लॅश चार्ज मिळेल, तर 50W वायरलेस फ्लॅश चार्जर सपोर्ट उपलब्ध असेल. तसेच, हा फोन ColorOS 12 सिस्टमवर काम करेल, जो Android आधारित आहे.

वनप्लस 10 प्रो चा संभाव्य प्रोसेसर

OnePlus ने नेहमीच लेटेस्ट आणि फ्लॅगशिप प्रोसेसर वापरला आहे. यावेळी देखील कंपनी लेटेस्ट प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चा वापर करु शकते. यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल.

इतर बातम्या

Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिटवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद, जाणून घ्या डिटेल्स

सर्वात जलद चार्ज होणाऱ्या Xiaomi 11i HyperCharge ची लाँच डेट जाहीर, किंमत…

फ्लॅगशिप प्रोसेसर, 60MP कॅमेरासह Moto चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज

(OnePlus 10 Pro may come with 32MP selfie Camera and 12GB Ram, specs leaked before its launch)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.