AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OnePlus 11 कॉन्सेप्ट स्मार्टफोन MWC 2023 इव्हेंटमध्ये सादर, जाणून घ्या खासियत

वनप्लस कंपनीच्या मोबाईल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2023 कार्यक्रमात वनप्लस 11 कॉन्सेप्ट स्मार्टफोन सादर केला आहे.

OnePlus 11 कॉन्सेप्ट स्मार्टफोन MWC 2023 इव्हेंटमध्ये सादर, जाणून घ्या खासियत
OnePlus 11 कॉन्सेप्ट स्मार्टफोनची एकच हवा, फीचर्स आणि इतर बाबी जाणून घ्याImage Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 6:45 PM

मुंबई : मोबाईल निर्मात्या कंपन्या एकापेक्षा एक सरस असे स्मार्टफोन सादर करत असतात. त्यामुळे मोबाईलप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचते. अशीच उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून वन प्लस 11 कॉन्सेप्ट स्मार्टफोनबाबत होती. कंपनीने या स्मार्टफोनचा टीझर अधिकृत वेबसाईटवर लाँच केला होता. अखेर कंपनीने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2023 कार्यक्रमात आपला नवा कोरा वन प्लस 11 कॉन्सेप्ट स्मार्टफोन लाँच केला. गेमिंगवर आधारित वनप्लस 11 कॉन्सेप्ट चांगल्या कुलिंगसाठी अॅक्टिव्ह CryoFlux सुविधेसह सादर केला आहे.

जर तुम्ही तासंतास फोनवर घालवत असाल किंवा गेम्स खेळत असाल तर फोन गरम होतो. मात्र नव्या वनप्लस 11 कॉन्सेप्ट फोनमध्ये असं काही होणार नाही. कंपनीच्या मते, वनप्लस 11 कन्सेप्टसह कुलिंग सिस्टम फोनला 2.1 डिग्री सेल्सियसपर्यंत थंड ठेवू शकतो. जर तुम्ही हा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर या स्मार्टफोनमध्ये काय खासियत आहे जाणून घेऊयात

  • वनप्लसने दावा केला आहे की, नवी कुलिंग सिस्टम फ्रेमरेट्सला आणखी व्यवस्थित ठेवू शकेल. जेव्हा फोन चार्ज होत असेल तेव्हा कुलिंग सिस्टम अपकमिंग फोनला 1.6 डिग्री सेल्सियसपर्यंत थंड करू शकतो.
  • वनप्लस 11 कॉन्सेप्ट फोनमध्ये ग्लास युनिबॉडी डिझाईन दिली आहे. आत औक मेटल अलॉयची कोटिंग असणार आहे.
  • वनप्लसने फोन सादर केला असला तरी या फोनमधील फीचर्सबाबत माहिती शेअर केलेली नाही. स्मार्टफोन हार्डवेअर बाबतही अधिकृत माहिती दिलेली नाही.
  • अहवालानुसार या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 चिपसेट असण्याची शक्यता आहे.
  • वनप्लस 11 कॉन्सेप्ट फोनमध्ये कॅमेरा लेंसमध्ये एखादी चांगली खासियत पाहायला मिळू शकते.
  • वनप्लस 11 5 जी स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन एक्सआर डेव्हलपर्स प्लॅटफॉर्म आहे. जो डेव्हलपर्ससाठी एक्सआरसाठी एआरची कॅपिसिटी तपासण्यासाठी तयार केली आहे.
  • मोबाईल वर्ल्ड काँग्रेस दरम्यान कंपनीने रे ट्रेसिंग टेक्नॉलॉजीवर परफेक्ट वर्ल्ड गेम्ससह एक टेक्निकल पार्टनरशिप केली आहे.
  • या इव्हेंटमध्ये कंपनीने वनप्लस बड्स प्रो 2 टीडब्ल्यूएस इअरबड्स, वनप्लस पॅड आणि वनप्लस 45 वॅट लिक्विड कूलर थर्मोइलेक्ट्रिक कूलरही शोकेस केलं आहे.

स्पेनमध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस इव्हेंट सुरु आहे. या कार्यक्रमात वेगवेगळ्या कंपन्या आपले नवे स्मार्टफोन सादर करतील. या इव्हेंटपूर्वीच शाओमीने आपला लेटेस्ट लाइनअप सादर केला होता.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.