OnePlus 13 Series आज होणार लाँच, उत्तम कॅमेरा, दमदार प्रोसेसरसह किंमत जाणून घ्या

OnePlus 13 Series : तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. आज वनप्लस 13 आणि वनप्लस 13R लाँच होणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला उत्तम कॅमेरा, दमदार रॅम आणि प्रोसेसरसह दमदार बॅटरी देखील मिळेल. या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल चला तर मग जाणून घेऊया.

OnePlus 13 Series आज होणार लाँच, उत्तम कॅमेरा, दमदार प्रोसेसरसह किंमत जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 9:14 AM

OnePlus 13 Series: तुम्ही स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण, आज वनप्लस 13 आणि वनप्लस 13R लाँच होणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये दमदार रॅम आणि प्रोसेसरसह बरंच काही खास मिळू शकतं. याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगली संधी ठरू शकतो. गेल्या आठवड्यात अनेक नवे स्मार्टफोन लाँच करण्यात आले होते, याच एपिसोडमध्ये आज वनप्लस 13 आणि वनप्लस 13R लाँच होणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला उत्तम कॅमेरा, दमदार रॅम आणि प्रोसेसरसह दमदार बॅटरी देखील मिळेल. चला तर मग जाणून घेऊया.

वनप्लस 13 सीरिज

वनप्लस 13 सीरिजमध्ये दोन मॉडेल्स असतील. पहिला वनप्लस 13 आणि दुसरा वनप्लस 13R. वनप्लस 13 हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. आता याचे ग्लोबल व्हर्जन भारतात लाँच करण्यात येणार आहे. यात जुन्या मॉडेलचा 50 मेगापिक्सलचा LYT-808 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या टेलिफोटो आणि अल्ट्रावाइड लेन्समध्ये 50 मेगापिक्सलचे नवे सेन्सर आहेत. कॅमेरा सिस्टीम Hasselblad ब्रँडेड आहे. हे 4K/60fps डॉल्बी व्हिजन व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करते. यामुळे व्हिडिओची गुणवत्ता सुधारते.

OnePlus 13 मध्ये IP68 आणि IP69 रेटिंग आहे. हे पाणी आणि उच्च दाबाच्या पाण्याच्या धक्क्यांपासून त्याचे संरक्षण करते. यात अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. यामुळे ओल्या हातांनीही तुम्ही फोन अनलॉक करू शकता. गेमिंगचा अनुभव सुधारण्यासाठी यात रिफाइंड व्हायब्रेशन मोटर देखील आहे.

प्रोसेसर

वनप्लस 13 स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite चिपसेट आहे. वनप्लस 13R मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर असेल. हे दोन्ही स्मार्टफोन OxygenOS 15 वर काम करतील. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित आहे. त्यांना अनेक वर्षांपासून सॉफ्टवेअर अपडेट मिळणे अपेक्षित आहे. OnePlus 13R मध्ये 1.5K रिझोल्यूशन डिस्प्ले असू शकतो. त्याचबरोबर दोन्ही स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह स्मूथ व्हिज्युअल्स देण्यात येणार आहेत.

किंमत

अनेक ऑनलाइन लीकनुसार, वनप्लस 13R ची किंमत 40,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. तर वनप्लस 13 ची किंमत 70,000 रुपयांच्या आसपास असू शकते. जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर वनप्लस 13 सीरिज तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.