Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OnePlus 9 5G वर बंपर सूट, 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

वनप्लसच्या या फ्लॅगशिप डिव्हाइसला सवलतीत खरेदी करू शकता. हा फोन सुमारे 20 हजार रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. या फोनच्या खरेदीवर तुम्हाला अनेक प्रकारच्या ऑफर्स मिळत आहेत.  

OnePlus 9 5G वर बंपर सूट, 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 12:06 AM

मुंबई : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर वनप्लसच्या (OnePlus) फ्लॅगशिप डिव्हाइसवर एक जबरदस्त ऑफर आहे. तुम्ही 2021 मध्ये लाँच केलेला वनप्लस 9 5G सवलतीत खरेदी करू शकता. कंपनीने हा फोन 49 हजार रुपये किमतीत लाँच (Launch) केला आहे. सध्या 12 हजार रुपयांहून अधिक सवलतीच्या दरात त्याची विक्री केली जात आहे. यावर इतरही अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. तुम्ही हा फोन किती आणि कुठून खरेदी करू शकता त्याबाबत या लेखातून माहिती देणार आहोत.

काय आहेत ऑफर

वनप्लसच्या या फोनची किंमत सध्या 37,999 रुपये आहे. कंपनीने हा डिवाइस भारतात 49,999 रुपयांना लाँच केला होता. ब्रँडच्या अधिकृत साइटवर, डिव्हाइसचा बेस व्हेरिएंट म्हणजेच 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 37,999 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही सिटीबँक कार्ड वापरत असल्यास, तुम्हाला त्यावर 10 टक्के अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. इतकेच नाही तर अमेरिकन एक्सप्रेस कार्डवर फोनवर 10 टक्के कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. तुम्ही बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड वापरत असल्यास, तुम्हाला 6 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील मिळेल.

हे सुद्धा वाचा

10 टक़्के सूट म्हणजे तुम्ही फोनच्या खरेदीवर 3799 रुपये वाचवू शकता. त्यानंतर या फोनची किंमत 35 हजार रुपयांपेक्षा कमी होईल. तुम्ही तुमचा जुना फोन देखील बदलू शकता. एक्सचेंज ऑफरनंतर तुम्ही हा फोन 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. याला 6 महिन्यांसाठी Spotify प्रीमियममध्ये ॲक्सेस मिळत आहे. 8GB रॅम वेरिएंट सध्या कंपनीच्या वेबसाइटवर 37,999 रुपयांना उपलब्ध आहे, तर 12GB रॅम वेरिएंट 42,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे.

वनप्लसचे हे डिव्हाईस आकर्षक फीचर्ससह उपलब्ध आहे. यामध्ये AMOLED डिसप्ले, Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आणि 12GB पर्यंत रॅम आहे. फोनमध्ये 48MP + 50MP + 2MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. समोर 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाइस 4500mAh बॅटरी आणि 65T जलद चार्जिंगसह येते. यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंगचा पर्याय देखील मिळेल. OnePlus त्याच्या फोनवर चार वर्षांसाठी तीन प्रमुख OS अपडेट्स आणि सेफ्टी ऑफर करते. हा फोन Android 11 सह लाँच करण्यात आला असून त्याला Android 13 पर्यंत अपडेट मिळण्याची अपेक्षा आहे. जर तुम्ही 30 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत या मोबाईलला खरेदी करू शकत असाल तर हा एक चांगला पर्याय असू शकतो.

दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?.
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं.
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया.
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका.
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा.
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं..
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं...
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट.
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.