वनप्लस 9 सिरीज पुढील वर्षी लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स

वनप्लस (OnePlus) ही स्मार्टफोन कंपनी पुढील वर्षी मार्चमध्ये त्यांची फ्लॅगशिप ‘वनप्लस 9’ सिरीज लाँच करु शकते.

वनप्लस 9 सिरीज पुढील वर्षी लाँच होणार, जाणून घ्या फिचर्स
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 3:51 PM

मुंबई : वनप्लस (OnePlus) ही स्मार्टफोन कंपनी पुढील वर्षी मार्चमध्ये त्यांची फ्लॅगशिप ‘वनप्लस 9’ सिरीज लाँच करु शकते. या सिरीजमध्ये वनप्लस 9 (Oneplus 9) आणि 9 प्रो (Oneplus 9 Pro) या दोन स्मार्टफोन्सचा समावेश असेल. परंतु नुकतीच अशी माहिती मिळाली आहे की, कंपनी या सिरीजमध्ये वनप्लस 9 लाईट (OnePlus 9 Lite) हा अजून एक स्मार्टफोन लाँच करु शकते. (OnePlus 9 series will be launched next year with special features)

अँड्रॉयड सेंट्रलच्या रिपोर्टनुसार वनप्लस 9 लाईट (OnePlus 9 Lite) मधील अनेक फिचर्स हे नुकत्याच लाँच झालेल्या OnePlus 8 T सारखेच असतील. हा स्मार्टफोन 90 हर्ट्ज किंवा 120 हर्ट्जच्या एमोलेड डिस्प्ले आणि 8 टी प्रमाणे क्वॉड-कॅमेरा सेटअपसह लाँच केला जाऊ शकतो. वनप्लस 9 आणि 9 प्रो क्वॉलकॉमच्या नव्या 5 एनएम चिपसेट आणि स्नॅपड्रॅगन 888 सह लाँच केले जातील. परंतु वनप्लस 9 लाईटमध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर असेल.

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार या फोनचा बॅक कव्हर प्लास्टिकचा असेल आणि या फोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधा दिली जाणार आहे. असं म्हटलं जातंय की, वनप्लस 9 डिवाइस होप-पंच डिझाईनवाल्या फ्लॅट डिस्प्लेसह लाँच केला जाईल. जिग्मोचायनाच्या रिपोर्टनुसार वनप्लस 9 चं बॅक पॅनल कर्व्ड असेल. तसेच या फोनचा कॅमेरा मॉड्यूल ट्रँगल शेपचा असेल. कॅमऱ्यांमध्ये दोन मोठ्या लेन्स, एक छोट्या आकाराचा कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश असेल. हा फोन एमोलेड डिस्प्ले (सेंटर्ड पंच होलसह), 144 एचझेड रिफ्रेश रेट स्क्रिन, आयपी 68 रेटिंग, एनएफसी, डुअल स्टिरीयो स्पीकर्स आणि अन्य फिचर्ससह लाँच केला जाणार आहे.

वनप्लसचं नवं स्मार्टवॉच येणार

या फोनसह कंपनी सध्या एका स्मार्टवॉचवर काम करत आहे. हे स्मार्टवॉच कंपनी पुढील वर्षाच्या सुरुवातीला लाँच करणार आहे. कंपनीने अद्याप लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नाही. अशातच कंपनी पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत त्यांचं स्मार्टवॉच लाँच करु शकते. असं सांगितलं जातंय की, वनप्लसचं आगामी काळात लाँच होणारं स्मार्टवॉच हे गुगल प्लॅटफॉर्मवर काम करेल. तसेच या स्मार्टवॉचमध्ये स्नॅपड्रॅगन वियर सिस्टिम-ऑन-चिपची सुविधा असू शकते.

हेही वाचा

Google Pixel 6 मध्ये खास अंडर डिस्प्ले कॅमरा दिसणार? स्मार्टफोनच्या पेटंट डिझाईनची जोरदार चर्चा

Year Ender 2020 : ‘हे’ आहेत 6000mAh क्षमतेची बॅटरी असणारे या वर्षातले टॉप 3 स्मार्टफोन

Flipkart Electronics Sale 2020 : ‘या’ स्मार्टफोनवर मिळतेय 20,000 रुपयांची सूट

एकदा चार्ज करा, 40 दिवस बॅटरी टिकणार, Tecno Spark 6 Go भारतात लाँच

(OnePlus 9 series will be launched next year with special features)

Non Stop LIVE Update
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.