Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनप्लस 10 प्रो पाठोपाठ OnePlus 9RT लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फोनमध्ये काय असेल खास?

OnePlus ने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की, ते 14 जानेवारी रोजी भारतात आपला लोकप्रिय OnePlus 9RT स्मार्टफोन आणि OnePlus Buds Z2 True Wireless Stereo (TWS) इयरफोन लॉन्च करतील.

वनप्लस 10 प्रो पाठोपाठ OnePlus 9RT लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फोनमध्ये काय असेल खास?
OnePlus (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 6:00 AM

मुंबई : OnePlus ने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की, ते 14 जानेवारी रोजी भारतात आपला लोकप्रिय OnePlus 9RT स्मार्टफोन आणि OnePlus Buds Z2 True Wireless Stereo (TWS) इयरफोन लॉन्च करतील. दरम्यान, OnePlus 9RT या स्मार्टफोनची भारतातील किंमत जाहीर झाली आहे. वास्तविक, भारतीय ग्राहक अजूनही OnePlus 9RT ची वाट पाहात आहेत. मात्र हा फोन चीनमध्ये आधीच लॉन्च झाला आहे, T व्हर्जन भारतात दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला लॉन्च केले जाते, यावर्षी मात्र त्यास उशीर झाला आहे. (OnePlus 9RT to launch in India on 14th January 2022)

भारतात, हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेजसह सादर केला जाईल. तसेच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट देखील मिळेल. चीनमध्ये 8 GB RAM व्हेरिएंट CNY 3,299 (सुमारे 38,800 रुपये) इतक्या किंमतीत लाँच करण्यात आलं आहे. भारतीय बाजारातील किमतही याच्या आसपास असेल. कंपनीने अद्याप या फोनच्या लाँचिंगबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. हे डिव्हाईस भारतात OnePlus Care अॅपवर पाहायला मिळाले आहे, जे सूचित करते की, हा मोबाइल लवकरच भारतात दाखल होऊ शकतो.

भारतातील या मोबाइल फोनचे फीचर्स चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या व्हर्जनसारखेच असतील. यात 6.62 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल. तसेच यामध्ये स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट दिला जाईल. भारतात या स्मार्टफोनची किंमत नुकतीच उघड झाली आहे.

OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9RT चीनमध्ये लाँच झाला आहे. ज्यामध्ये 6.62-इंचांचा ई 4 एमोलेड डिस्प्ले आहे, जो 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. तसेच, त्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास बसवला आहे.

OnePlus 9RT चा प्रोसेसर आणि रॅम

वनप्लस 9 आरटीच्या हार्डवेअरबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट वापरण्यात आला आहे, जो 12 जीबी पर्यंत रॅमसह येतो. तसेच, यात 256 GB UFS 3.1 इंटर्नल स्टोरेज मिळेल. हा स्मार्टफोन 19067.44 MM2 स्पेस कूलिंग सिस्टमसह येतो, जो गेमिंग दरम्यान स्मार्टफोन थंड ठेवतो.

OnePlus 9RT चा कॅमरा सेटअप

OnePlus 9RT च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात सोनी IMX766 चा सेन्सर आहे, ज्यामध्ये बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल f / 1.8 अपर्चर आहे, त्यामध्ये 6P लेन्स देण्यात आली आहे. ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायझेशन दोन्हीचे वैशिष्ट्य यामध्ये देण्यात आले आहे. तसेच, या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेन्सर आहे, जो 123 डिग्री फील्ड व्ह्यू कॅप्चर करू शकतो. तसेच, यात 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

OnePlus 9RT ची बॅटरी

OnePlus 9RT मध्ये 4500 mAh बॅटरी आहे, जी 65 टी Wrap चार्जिंगसह येते. हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित ColorOS 12 वर सादर करण्यात आला आहे, परंतु इतर देशांमध्ये तो OxygenOS 12 सह लाँच होऊ शकतो. मात्र, भारतात लॉन्च झालेल्या वनप्लस 9 आरटी चे सर्व स्पेसिफिकेशन्स सारखेच असतील की त्यात काही बदल होतील हे अजून कळलेले नाही.

इतर बातम्या

नवीन वर्षात व्हाट्सअपचे नवीन फिचर ! नोटिफिकेशनमध्ये दिसणार चेहरा, नोटिफिकेशनमध्ये युजरचा चेहरा स्क्रीनवर झळकणार

Vivo V23 : कलर चेंजिंग इफेक्ट असलेला भारतातला पहिला स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत…

Nokia Mobile : नोकियानं लॉन्च केले परवडणारे स्मार्टफोन्स, किंमत आणि फिचर्स एका क्लिकवर…

(OnePlus 9RT to launch in India on 14th January 2022)

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.