Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OnePlus 9RT लाँचिंगसाठी सज्ज, ऑक्टोबरमध्ये भारतासह चीनमध्ये लाँच होणार

चीनी स्मार्टफोन निर्माता वनप्लस ऑक्टोबरमध्ये एक नवीन स्मार्टफोन वनप्लस 9 आरटी (OnePlus 9RT) लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

OnePlus 9RT लाँचिंगसाठी सज्ज, ऑक्टोबरमध्ये भारतासह चीनमध्ये लाँच होणार
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 7:33 AM

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता वनप्लस ऑक्टोबरमध्ये एक नवीन स्मार्टफोन वनप्लस 9 आरटी (OnePlus 9RT) लॉन्च करण्याची योजना आखत आहे. एका नवीन अहवालात दावा करण्यात आला आहे की, वनप्लस कंपनी त्याच्या ‘टी’ सीरीजमधील एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे. वनप्लस 8 सीरीजसह, कंपनीने एक वेगळा प्रयोग करत वनप्लस 8 टी मॉडेल लाँच केले आणि आता वनप्लस 9 सह असेच काहीतरी करण्याची योजना कंपनी आखत आहे. परंतु या स्मार्टफोनसह कंपनी वनप्लस 9 आरचा (OnePlus 9R) फाउंडेशन म्हणून वापर करेल. वनप्लस 9 आरटी मॉडेलबद्दल काही माहिती आधीच उघड झाली आहे. (OnePlus 9RT will launch in India and china in october, know more)

या स्मार्टफोनबाबतच्या अहवालात असा दावा केला जात आहे की, या वर्षी वनप्लस 9 टी लाँच होणार नाही. वनप्लस ‘टी’ मालिका कंपनीच्या फ्लॅगशिप मालिकेची एक ट्वीक्ड आवृत्ती असेल. आता अँड्रॉइड सेंट्रलच्या एका अहवालात, इनसाइडर सोर्सचा हवाला देत, असे म्हटले गेले आहे की, टी सीरीजचा पुढील फोन या वर्षी लाँच केला जाईल, जो वनप्लस 9 आरटी (OnePlus 9RT) आहे, जो भारतीय आणि चीनी बाजारात लॉन्च केला जाईल.

या फोनच्या नावानुसार, ही वनप्लस 9 आर ची एक ट्वीक्ड आवृत्ती असेल जी वनप्लस 9 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर OnePlus 9RT ला OnePlus 9R सारखे 120Hz AMOLED पॅनल मिळेल. यात 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल आणि यासोबत 4500mAh ची बॅटरी मिळेल. या व्यतिरिक्त, त्याला स्नॅपड्रॅगन 870 ची हायर-बिन्ड आवृत्ती मिळेल. दुसरीकडे, जर आपण कॅमेराबद्दल बोललो तर या फोनला वनप्लस नॉर्ड 2 प्रमाणे 50 मेगापिक्सलचा सोनी IMX766 सेन्सर मिळेल.

सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाल्यास, हा पहिला वनप्लस फोन असेल जो Android 12 ऑउट ऑफ द बॉक्स वर बेस्ड OxygenOS 12 वर चालेल. हे ColorOS अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये आणेल. OxygenOS 12 मध्ये गुगलचा नवीन मटेरियल यू एस्थेटिंक मिळेल. यासह, अहवालात असेही म्हटले गेले आहे की, कंपनी ऑक्सिजन ओएस 12 ची बीटा आवृत्ती लॉन्च करण्याची योजना आखत होती, परंतु अनेक बग्समुळे त्याचे लाँचिंग थांबवण्यात आले. कंपनीची सॉफ्टवेअर टीम या बगचे निराकरण करण्याचे काम करत आहे. तथापि, वनप्लस 9 आरटी किंवा ऑक्सिजन ओएस 12 च्या क्लोज्ड बीटा वर्जनबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

इतर बातम्या

आता iOS वापरकर्तेही खेळू शकतात बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया, डाऊनलोडसाठी गेम उपलब्ध

भारतात 5G ची मारामार, तिकडे LG कडून 6G टेस्टिंग, डेटा ट्रान्समिशन प्रक्रिया यशस्वीपणे पार

रिअलमीने लाँच केले रिअलमी जीटी स्मार्टफोन आणि स्लिम बुक लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(OnePlus 9RT will launch in India and china in october, know more)

भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल.
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न.
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने.
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.