OnePlus Community Sale : मोबाईलपासून स्मार्ट टीव्हीपर्यतच्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काऊंट
वनप्लसने (One Plus) त्यांच्या कम्युनिटी सेलची (OnePlus Community Sale) सुरुवात केली आहे. या विक्रीत तुम्हाला वनप्लसच्या विविध उत्पादनांवर बंपर डिस्काऊंट मिळेल.
मुंबई : वनप्लसने (One Plus) त्यांच्या कम्युनिटी सेलची (OnePlus Community Sale) सुरुवात केली आहे. या विक्रीत तुम्हाला वनप्लसच्या विविध उत्पादनांवर बंपर डिस्काऊंट मिळेल. 4 दिवसांच्या सेलमध्ये सवलत, बँक डिस्काऊंट आणि नो कॉस्ट EMI चा लाभ घेता येईल. सर्व ऑफर्स वनप्लसच्या पोर्टफोलिओवर वैध असतील. 24 जूनपासून ही विक्री सुरू झाली असून ती 27 जूनपर्यंत चालणार आहे. या ऑफरमध्ये वनप्लस फ्लॅगशिप 9 सिरीज, वनप्लस 8 टी आणि नुकत्याच लाँच झालेल्या वनप्लस नॉर्ड CE 5G सारख्या वनप्लस स्मार्टफोनचा समावेश आहे. (OnePlus Community Sale : Discount on OnePlus 9 Pro, 9, 9R, OnePlus TV and more)
सेलमध्ये स्मार्टफोन व्यतिरिक्त ग्राहकांना वनप्लस टीव्ही, वनप्लस बड्स, वनप्लस बँड आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सूट मिळेल. आपणास ही सवलत वनप्लसचे सेलर्स जसे की, अमेझॉन इंडिया, वनप्लस एक्सपीरियन्स स्टोअर, रिलायन्स डिजिटल, माय जिओ स्टोअर्स आणि क्रोमासह अन्य भागीदारांकडे मिळेल. चला तर मग तुमच्यासाठी परफेक्ट डील कोणती आहे, ते जाणून घेऊया.
वनप्लस 9 प्रो : या फोनची मूळ किंमत 64,999 रुपये इतकी आहे, परंतु आपण हा फोन 61,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. येथे तुम्हाला 3000 रुपयांची सूट मिळत आहे. यासोबतच तुम्हाला एचडीएफसी बँक कार्डवर 5000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि इन्स्टंट डिस्काऊंटही मिळणार आहे. वनप्लस सध्या IoT बंडल पर्यायदेखील देत आहे. यात वनप्लस बँड्स किंवा वनप्लस बड्स 1299 रुपये आणि 3490 रुपये किंमतीत खरेदी करता येतील.
वनप्लस 9 आणि 9R वर सवलत
वनप्लस 9 हा स्मार्टफोन 44,500 रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येईल, यात आपल्याला 2499 रुपयांची सूट मिळत आहे. दुसरीकडे, एचडीएफसी कार्डवरही अशीच सूट मिळेल. तसेच यावर तुम्हाला नो कॉस्ट EMI चा लाभ घेता येईल. त्याचबरोबर वनप्लस 9 आर ची किंमत 37,999 रुपये इतकी आहे. या डीलमध्ये तुम्हाला 2000 रुपयांची सूट मिळेल. एचडीएफसी बँक कार्डवर त्वरित सवलत (इन्स्टंट डिस्काऊंट) केवळ 2000 रुपयांपर्यंत वैध आहे.
वनप्लस 8T : मागील वर्षी लॉन्च झालेलं हे फ्लॅगशिप डिव्हाइस तुम्ही 37,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. त्याचबरोबर IoT बंडल ऑफर आणि एचडीएफसी बँक कार्डवर 1500 रुपयांची सूटदेखील असेल.
वनप्लस नॉर्ड CE 5G : हा फोन नुकताच लाँच झाला आहे. या फोनवर 1000 रुपयांची सूट देण्यात आली आहे आणि 6 महिन्यांपर्यंतच्या नो कॉस्ट EMI चा पर्यायदेखील देण्यात आला आहे.
वनप्लस टीव्ही आणि इतर उत्पादनांवरही डिस्काऊंट
वनप्लस TV32Y1, वनप्लस टीव्ही 40Y1 आणि वनप्लस टीव्ही 43Y1 वर ग्राहकांना सवलत दिली जात आहे. ग्राहकांना या टीव्हींवर अनुक्रमे 1500, 2000 आणि 2500 रुपयांची सूट मिळू शकते. या टीव्हींची किंमत अनुक्रमे 14,499 रुपये, 21,999 रुपये आणि 24,499 रुपये इतकी आहे. दुसरीकडे, जर तुमच्याकडे एचडीएफसी बँक कार्ड असेल तर तुम्हाला अतिरिक्त सूट मिळू शकते.
इतर बातम्या
64MP Quad Cam, 256GB स्टोरेजसह Infinix चे दोन नवे स्मार्टफोन बाजारात, किंमत 11 हजारांहून कमी
नवा फोन घेताय? ‘या’ 5 दमदार स्मार्टफोनच्या किंमतीत 15000 रुपयांपर्यंतची कपात, पाहा पूर्ण यादी
(OnePlus Community Sale : Discount on OnePlus 9 Pro, 9, 9R, OnePlus TV and more)