256GB स्टोरेज, 32MP फ्रंट कॅमेरासह OnePlus Nord 2 5G भारतात दाखल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर वनप्लसने वनप्लस नॉर्ड 2 स्मार्टफोन (OnePlus Nord 2 5G) बाजारात सादर केला आहे.
मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर वनप्लसने वनप्लस नॉर्ड 2 स्मार्टफोन (OnePlus Nord 2 5G) बाजारात सादर केला आहे. नवीन वनप्लस नॉर्ड 2 5G कंपनीच्या स्मार्टफोन लाइनअपमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. कारण क्वालकॉम SoC च्या बदल्यात मीडियाटेक चिपसेट वापरण्यात आलेले हे वनप्लसचे पहिलेच डिव्हाइस आहे. फोनचं डिझाईन सध्याच्या वनप्लस 9 सिरीजप्रमाणेच आहे. फोनमध्ये सिंगल सेल्फी कॅमेराऐवजी आता ड्युअल फ्रंट कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे. (OnePlus Nord 2 5G Launched With MediaTek Dimensity 1200 SoC, 32MP Front Camera, check Price, Specs)
या इव्हेंटमध्ये कंपनीने नॉर्ड 2 सोबत वनप्लस प्रो बड्सुद्धा बाजारात लाँच केले आहेत. याचं डिझाईन अगदी Apple एअरपॉड्स प्रो प्रमाणेच आहे. वनप्लस नॉर्ड 2 5 जी च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये आपल्याला 6.43 इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले मिळेल जो 20: 9 च्या अॅस्पेक्ट रेश्योसह येतो. त्याचबरोबर त्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
फीचर्स
स्क्रीनवर एक पंचहोल कॅमेरा आहे जो वरच्या डाव्या कोपऱ्यात आहे, जो सेल्फी कॅमेरा म्हणून काम करतो. अंडर द हुड यामध्ये आपल्याला मीडियाटेक डायमेन्सिटी 1200 SoC देण्यात आला आहे, जो ARM G77 MC9 GPU सह येतो. त्याच वेळी, आपल्याला यामध्ये 12 जीबी LPDDR4X रॅम मिळेल. फोनमध्ये 256 जीबी स्टोरेज स्पेस आहे. हा फोन आऊट ऑफ दी बॉक्स अँड्रॉयड 11 बेस्ड ऑक्सिजन ओएस 11.3 वर चालतो. आणि ड्युअल सिम कार्डला सपोर्ट करतो.
कॅमेरा
फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मागच्या बाजूला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मोनो लेन्स शूटर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
इतर फीचर्स
फोनमधील इतर फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ व्ही 5.2, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक फीचर देण्यात आलं आहे. फोनची बॅटरी 4500mAh क्षमतेची आहे जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन यूएसबी टाइप सी पोर्टसह येतो. फोनमध्ये आपल्याला तीन स्टोरेज व्हेरिएंट्स मिळतील, ज्यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज, तसेच 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजचा समावेश आहे.
किंमत आणि व्हेरिएंट्स
भारतात या फोनची किंमत 27,999 रुपये इतकी आहे आणि ग्राहक 26 जुलैपासून हा फोन खरेदी करू शकतात. फोनची खुली विक्री अमेझॉनवर 28 जुलैपासून सुरू होईल. यासह, हा फोन वनप्लस चॅनेलद्वारेदेखील खरेदी करता येईल. फोन तीन रंगांमध्ये येतो ज्यात ग्रे, ब्लू आणि ग्रीन रंगांचा समावेश आहे.
इतर बातम्या
67W फास्ट चार्जरसह Poco F3 GT भारतात लाँच, वनप्लस नॉर्डला टक्कर
48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
(OnePlus Nord 2 5G Launched With MediaTek Dimensity 1200 SoC, 32MP Front Camera, check Price, Specs)