AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनप्लस वॉच 23 मार्चला होणार लाँच, जाणून घ्या वॉचची वैशिष्ट्ये आणि किंमत

हे फिटनेस वॉच ग्राहकांना सीमलेस कनेक्टिव्हिटी आणि बेस्ट इन-क्लास अनुभव प्रदान करेल. (OnePlus Watch will launch on March 23, find out the features and price of the watch)

वनप्लस वॉच 23 मार्चला होणार लाँच, जाणून घ्या वॉचची वैशिष्ट्ये आणि किंमत
वनप्लस वॉच 23 मार्चला होणार लाँच
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 6:19 PM

नवी दिल्ली : या वर्षाच्या सुरूवातीला वनप्लसने आपल्या पहिल्या फिटनेस बँडचे अनावरण केले होते आणि आता 23 मार्च रोजी आपला पहिला स्मार्टवॉच (वनप्लस वॉच) लॉन्च करणार आहे. वनप्लस असा दावा करीत आहे की त्यांचे हे फिटनेस वॉच ग्राहकांना सीमलेस कनेक्टिव्हिटी आणि बेस्ट इन-क्लास अनुभव प्रदान करेल. लाँच इव्हेंटला काही दिवस बाकी असताना या डिव्हाईसबद्दलची काही माहिती आणि अपडेट लिक झाली आहे. (OnePlus Watch will launch on March 23, find out the features and price of the watch)

वॉचचे डिझाईन आणि वैशिष्ट्ये काय असतील?

लाँच करण्यापूर्वी, वनप्लसने पुष्टी केली आहे की त्यांचे घड्याळ आपल्या हृदयाच्या गतीवर निगरानी ठेवू शकेल. कंपनीने पोस्ट केलेल्या एका छोट्या व्हिडिओमध्ये असेही सुचवले गेले की हे डिव्हाईस वॉटरप्रूफ असेल. टीझरनुसार ते ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. कंपनी आश्वासन देत आहे की डिव्हाइसमध्ये एक शानदार आणि लाईटवेट डिझाईन असेल. “एका टीझरमध्ये असे सुचवले गेले की स्मार्टवॉचमध्ये साईड बटन, रबर किंवा सिलिकॉन स्ट्रॅप आणि एक गोल डायल असेल.

वनप्लस वॉच गुगलच्या वेअर ओएससह येत नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. हे आरटीओएस-आधारीत ऑपरेटिंग सिस्टमवर चालते, जे वापरकर्त्यांना चांगला परफॉर्मन्स आणि बॅटरी प्रदान करते असे म्हटले जाते. कालच एका अहवालात वनप्लस वॉचची प्रमुख वैशिष्ट्ये लीक झाली आहेत. फिटनेस ट्रॅकर आपल्या झोपेचा नमुनेा, तणावाची पातळी, ब्लड सॅच्युरेशन तसेच हृदय गती ट्रॅक करण्यास सक्षम असेल. हे स्वयंचलित वर्कआउट डिटेक्शन फिचर आणि स्विमिंग मोडसह येईल.

– वनप्लस वॉचमध्ये 4 जीबी स्टोरेज आणि 46 मिमी डायल असल्याचे म्हटले आहे. वनप्लस टीव्हीसाठी रिमोट म्हणून घड्याळ वापरण्यास सक्षम आहे .

– हे वनप्लसच्या वार्प चार्ज तंत्रज्ञानास समर्थन देऊ शकते, जे केवळ 20 मिनिटांच्या चार्जिंगसह 7 दिवसांची बॅटरी प्रदान करते.

– हे सिल्व्हर आणि ब्लॅक अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार आपण वनप्लस वॉच वरून फोन कॉल करू किंवा उत्तर देऊ शकता.

– हे डिव्हाईस आपल्या फोनवरील सूचना देखील दर्शवू शकते आणि संगीत नियंत्रित करू शकते. हे एलटीई व्हेरिएंटमध्ये सादर केले जाईल.

किंमत आणि उपलब्धता

वनप्लसचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, हे स्मार्टवॉच परवडणार्‍या किंमतीत सर्वोत्कृष्ट दर्जाचा अनुभव प्रदान करेल. कंपनी 10,000 रुपये किंमतीसह वनप्लस वॉच बाजारात आणण्याची शक्यता आहे. जर या सेगमंटमध्ये वेअरेबल्स लाँच केले गेले तर ह वॉच इव्हॉल्व, रियलमी वॉच एस प्रो आणि अमेझफिट घड्याळांशी स्पर्धा करेल. आगामी फिटनेस ट्रॅकर Amazon.in वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. वनप्लस वॉच बहुदा वनप्लस इंडियाच्या अधिकृत साईटवरून विक्री केला जाईल. (OnePlus Watch will launch on March 23, find out the features and price of the watch)

इतर बातम्या

पैशाला पैसे लावत, प्रियंकाची आणखी एक गरुडझेप ! अमेरिकेत खास भारतीय नावाचं ‘इंडियन रेस्टॉरंट’

Corona Update : भारतातील 8 राज्यांनी चिंता वाढवली, महाराष्ट्रासह कोणत्या राज्यांचा समावेश?

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....