OpenAI has bought the domain chat.com: सध्या चॅट जीपीटी (ChatGPT) चांगलेच चर्चेत आहे. जगभरातील नेटकऱ्यांमध्ये चॅट जीपीटी लोकप्रिय झाले आहे. आता चॅट जीपीटीने जगतील सर्वात जुने डोमेन नेम विकत घेतले आहे. Chat Dot com या डोमेन नेमसाठी चॅट जीपीटीने तब्बल 15 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे 126 कोटी रुपये खर्च केले आहे. भारतीय वंशाचा व्यक्ती धर्मेश शाह यांनी हे डोमेन नेम विकले आहे. धर्मेश शाह हबस्पॉटचे को-फाउंटर आणि सीटीओ आहे. आतापर्यंतची सर्वात महाग डोमेन डील असल्याचे धर्मेश शाह यांनी म्हटले आहे.
ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमॅन यांनी एक्सवर एक URL पोस्ट केली. त्यामुळे chat.com लिहिले होते. त्यावर क्लिक करताच ऑटोमॅटिकली चेटजीपीटीवरील रूटवर जातो. आता Chat. com सरळ OpenAI च्या ChatGPT सोबत रिडायरेक्ट झाला आहे. ही डील 15 मिलियन अमेरिकी डॉलरमध्ये झाली आहे. Chat.com इंटरनेट जगातील जुने डोमेन नेम आहे. त्याला 1996 मध्ये रजिस्टर्ड करण्यात आले होते. मागील वर्षीच धर्मेश शाह यांनी Chat. com विकत घेतले होते.
— Sam Altman (@sama) November 6, 2024
डोमेन विकल्याचा खुलासा झाल्यानंतर धर्मेश शाह म्हणाले की, एआय स्टार्टअपने त्यांना या डीलसाठी रोख रकमेऐवजी शेअर्समध्ये पैसे दिले. त्याची किंमत मी आता उघड करणार नाही. परंतु ती 8-आकड्यांमध्ये आहे. हा आतापर्यंतचा सर्वात महागडा डोमेन करार आहे. Chat.com सिंपल, शॉर्टनेस आणि मुद्दा मांडण्यात उत्कृष्ट आहे. यामुळे युजरचा आत्मविश्वास वाढवतो. कोणीतरी ही यशस्वी कंपनी तयार करेल, असे मला वाटत होते.
BREAKING NEWS: Secret acquirer of $15+ million domain chat .com revealed and it's exactly who you'd think.
For those of you that have been following me for a while, you may recall that I announced earlier this year that I had acquired the domain chat .com for an "8 figure sum"… https://t.co/nv1IyddP5z
— dharmesh (@dharmesh) November 6, 2024
Chat.com ची विक्री तंत्रज्ञानाच्या जगातील महत्वाची घडामोड ठरली आहे. त्यामुळे व्हॅनिटी डोमेन म्हणजेच ब्रँड किंवा व्यक्तीचे नाव किती महत्वाचे आहे, हे समजून येते. यापूर्वी एआय स्टार्टअपने Friend ने friend.com हा डोमेन नेम 1.8 मिलियन अमेरिकी डॉलरमध्ये घेतले होते.