5000mAh बॅटरी, 6GB रॅम, किंमत खूपच कमी, ओप्पो A74 5G भारतात लाँच, शाओमी, रियलमीला टक्कर
स्मार्टफोन बनवणारी कंपनी ओप्पो (Oppo) त्यांच्या ‘A’ सिरीजद्वारे भारतीय युजर्सना आकर्षित करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
मुंबई : स्मार्टफोन बनवणारी कंपनी ओप्पो (Oppo) भारतात रियलमी आणि शाओमीला जोरदार टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. कंपनी त्यांच्या ‘A’ सिरीजद्वारे भारतीय युजर्सना आकर्षित करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारतात कंपनीने अलीकडेच 15,000 रुपयांच्या रेंजमध्ये ओप्पो ए 54 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. अशा परिस्थितीत कंपनीने आता त्याच सिरीजमधील आणखी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. (Oppo A74 5G with 5000 mAh battery launched in India; check Price and specs)
ओप्पो कंपनीने आता Oppo A74 5G भारतात लाँच केला आहे. हा एक 5 जी फोन आहे जो एफएचडी + डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच यामध्ये मल्टी कूलिंग सिस्टमदेखील देण्यात आली आहे.
किंमत
ओप्पो A74 5G या स्मार्टफोनची किंमत 17,900 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन दोन रंग पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. यामध्ये फ्लयूड ब्लॅक आणि फँटॅस्टिक पर्पल अशा दोन रंगांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन 26 एप्रिलपासून अमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल. ग्राहकांना येथे क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्ड ईएमआय आणि डेबिट कार्डवर 10 टक्के त्वरित सूट देण्यात आली आहे. त्याच वेळी, जे ग्राहक ओप्पो ए 75 5 जी स्मार्टफोन खरेदी करतील त्यांना 1299, 2499 आणि 2499 रुपयांच्या डिस्काऊंटेड किंमतीसह ओप्पो Enco W11, ओप्पो बँड आणि ओप्पो W21 खरेदी करता येईल.
फीचर्स
ओप्पो A74 5G हा स्मार्टफोन 6.5 इंच एफएचडी + डिस्प्ले आणि 1080 * 2400 पिक्सल रिझोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रीफ्रेश रेटसह मिळेल. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर आहे जो 6 जीबी रॅमसह येतो. हा स्मार्टफोन 128 जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या फोनची स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डसह वाढवता येईल.
हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो, जो कंपनीचा स्वतःचा कलरओएस 11.1 आहे. फोन ड्युअल सिम आहे आणि साइड माउंट केलेल्या फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. यात 5000mAh बॅटरी आहे जी 18 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा मुख्य सेन्सर 48 मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे.
इतर बातम्या
6000mAh बँटरी, 108MP कॅमेरासह Moto G60 आणि Moto G40 लाँच, किंमत…
6GB/128GB, क्वाड कॅमेरासह POCO M2 Reloaded बाजारात, उरले फक्त काही तास
3GB/64GB, 6,999 रुपयात खरेदी करा 6000 mAh बॅटरीवाला फोन, अमेझॉनवर पहिला सेल
(Oppo A74 5G with 5000 mAh battery launched in India; check Price and specs)