आज लॉन्चिंगचा धमाका! Oppo Reno 13 Series आणि Poco X7 5G स्मार्टफोन लॉन्च होणार, फीचर्स, किंमत जाणून घ्या
तुम्ही स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. आज Oppo Reno 13 Series आणि Poco X7 5G सीरिज लॉन्च करणार आहात. या दोन्ही सीरिजमध्ये अनेक नवे स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. ऑफिशियल लाँचिंगपूर्वी ओप्पो आणि पोको सीरिजच्या नव्या स्मार्टफोन्समध्ये कोणते फीचर्स पाहायला मिळणार आहेत? याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
तुम्ही लेटेस्ट नवा स्मार्टफोन घेण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आज चार नवे स्मार्टफोन भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. Oppo Reno 13 Series व्यतिरिक्त Poco X7 5G सीरिज लॉन्च होणार आहे, नवीन फोन लॉन्च होण्यापूर्वीच कंपनीने या स्मार्टफोन्समध्ये सापडलेल्या खास फीचर्सची पुष्टी केली आहे.
अधिकृत लाँचिंगनंतर ओप्पो आणि पोको कंपनीचे हे नवे स्मार्टफोन कंपनीच्या साइटव्यतिरिक्त ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विकले जातील.
बहुप्रतीक्षित Poco X7 सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामुळे मिड-रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये लक्षणीय वाढ होईल. Poco X7 आणि Poco X7 प्रो चा समावेश असलेल्या नवीन लाइनअपने आधीच बरीच चर्चा निर्माण केली आहे. टीझरमध्ये त्याचे आकर्षक डिझाइन आणि फीचर्स आहे.
Oppo Reno 13 Series लॉन्च कधी होणार?
Oppo Reno 13 आणि Oppo Reno 13 प्रो आज लाँच होणार आहेत. फ्लिपकार्टवर या सीरिजसाठी एक वेगळं पेज तयार करण्यात आलं असून आज संध्याकाळी 5 वाजता ही नवी सीरिज लॉन्च होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Oppo Reno 13 Series ची किंमत किती? नुकतीच एका टिप्सटरने Oppo Reno 13 Series च्या किंमतीशी संबंधित माहिती लीक केली होती. लीकनुसार, Oppo Reno 13 प्रो 5G च्या 8 GB / 128 GB आणि 8GB / 256 GB व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 37,000 रुपये आणि 39,999 रुपये असू शकते.
Poco X7 सीरीज कधी लॉन्च होणार?
Poco X7 सीरिज आज संध्याकाळी 5.30 वाजता ग्राहकांसाठी लाँच केली जाईल, या सीरिजमध्ये Poco X7 आणि Poco X7 प्रो लॉन्च केले जातील.
Poco X7 ची किंमत किती?
रिपोर्ट्सनुसार, Poco X7 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते, तर Poco X7 प्रो 30,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत ग्राहकांसाठी लॉन्च केला जाऊ शकतो. इव्हेंटदरम्यान दोन्ही फोनच्या अधिकृत किंमतीवर पडदा टाकण्यात येणार आहे.
मिड-रेंज Poco X7 सीरिज आज अधिकृतपणे भारतात आणि जागतिक स्तरावर लॉन्च केली जाईल. लाइनअपमध्ये व्हॅनिला Poco X7 आणि Poco X7 प्रो या दोन मॉडेल्सचा समावेश असेल आणि हे Poco X6 लाइनअपची जागा घेतील. कंपनीने फोनबद्दल कॅमेरा, बॅटरी आणि बरेच काही टीज केले आहे. लाँचिंगपूर्वी अपेक्षित किंमत वर आम्ही दिली आहे. ही माहिती तुमच्या उपयोगात येऊ शकते.