OPPO Reno 7 5G न्यू ईयर एडिशन लॉन्च, जाणून घ्या नवीन फोनमध्ये काय असेल खास?

Oppo Reno 7 5G चे स्पेशल व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे, जे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लाल रंगात सादर करण्यात आले आहे. Oppo Reno 7 5G New Year Edition असे त्याचे नाव आहे. लाल रंगात येणारा हा फोन खूपच आकर्षक आहे.

OPPO Reno 7 5G न्यू ईयर एडिशन लॉन्च, जाणून घ्या नवीन फोनमध्ये काय असेल खास?
Oppo Reno 7
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 11:47 PM

मुंबई : Oppo Reno 7 5G चे स्पेशल व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे, जे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लाल रंगात सादर करण्यात आले आहे. Oppo Reno 7 5G New Year Edition असे त्याचे नाव आहे. लाल रंगात येणारा हा फोन खूपच आकर्षक आहे. हा फोन नुकताच चीनमध्ये सादर करण्यात आला आहे आणि इतर देशांमध्ये कधी लाँच होईल याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Oppo Reno 7 या वर्षी नोव्हेंबरमध्ये सादर करण्यात आला होता. (OPPO Reno 7 5G new year special editions launched, check its Specs)

Oppo Reno 7 5G New Year Edition हे रिडिझाइन केलेले मॉडेल आहे आणि त्याचे फीचर्स नोव्हेंबरमध्ये लॉन्च झालेल्या फोनसारखेच आहेत. या Oppo मोबाईलमध्ये 6.43 इंचांचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल आहे. त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. तसेच, यात 90hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले देण्यात आला आहे.

OPPO Reno 7 5G अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12 वर चालतो. या मोबाईलला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर मिळते. सोबत एड्रेनो 642 एल जीपीयू देण्यात आला आहे. फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.

या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स 709 सेन्सरसह सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स दिली आहे. या फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे, जी 65वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Oppo Reno सिरीज ही एक लोकप्रिय मोबाईल फोन सिरीज आहे. यात अनेक उत्तमोत्तम फीचर्स आणि आकर्षक डिझाइन देण्यात आले आहे. हा एक फ्लॅगशिप सीरीज फोन आहे जो किफायतशीर दरात येतो. Oppo Reno सिरीज Vivo V21, OnePlus Nord 2 सारख्या ब्रँडशी स्पर्धा करते. Oppo स्वतःच एका लोकप्रिय ब्रँडकडे वाटचाल करत आहे.

इतर बातम्या

8GB रॅम आणि i5 प्रोसेसरवाले लॅपटॉप स्वस्तात खरेदीची संधी, HP, Dell, lenovo चे पर्याय

Airtel Vs JioFiber Vs BSNL: 50Mbps स्पीडसह 500 रुपयांपेक्षा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन, जाणून घ्या बेस्ट ऑप्शन्स

PHOTO | Highest Selling Mobile 2021 : शाओमी ते वनप्लस पर्यंत 2021 मध्ये सर्वाधिक विक्री झालेले मोबाईल

(OPPO Reno 7 5G new year special editions launched, check its Specs)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.