I Phone: सर्वांचे आयफोन खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार… फक्त ‘या’ दिवसाची वाट पहा…

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलच्या पार्श्वभूमीवर आयफोन 13 आणि आयफोन 12 सीरिजचे फोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. 23 सप्टेंबरपासून Amazon चा सेल देखील सुरु होणार आहे. यात ग्राहकांना विविध डिस्काउंट मिळणार आहेत.

I Phone: सर्वांचे आयफोन खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार... फक्त ‘या’ दिवसाची वाट पहा...
i phone 14 maxImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 5:26 PM

ॲप्पलने (Apple) या महिन्यात 7 सप्टेंबर रोजी आयफोन 14 (iPhone 14) आणि आयफोन 14 प्रो (iPhone 14 Pro) या आपल्या नवीन सीरीजचे अनावरण केले होते. परंतु या आयफोनची किंमत बरीच असल्याने सर्वांना ते घेणे शक्य होत नाही. परंतु आता निराश होण्याची गरज नाही. कारण आयफोन घेण्याचे स्वप्न बऱ्याच लोकांचे पूर्ण होणार आहे. तुम्हीही स्वस्त आयफोन घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर लवकरच तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान, आयफोन 13 आणि आयफोन 12 आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. फ्लिपकार्टवर सेल सुरू होणार आहे. या सेल दरम्यान, दोन जुन्या आयफोन स्मार्टफोनवर चांगली सूट मिळणार असून ही सूट किती असेल याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही.

iPhone 11 देखील विक्रीसाठी उपलब्ध

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये आयफोन 13 आणि आयफोन 12 व्यतिरिक्त आयफोन 11 चा पर्याय देखील उपलब्ध आहे. दरवर्षी कंपनी आपला लेटेस्ट आयफोन लाँच केल्यानंतर जुन्या मॉडेल्सच्या किमतीत कपात करते त्यामुळे या डिस्काउंटचा फायदा अनेक ग्राहकांना मिळत असतो. फ्लिपकार्टसोबतच Amazon देखील भारतात सेल सुरू करणार आहे. यासाठी ग्राहकांना 23 सप्टेंबरपर्यंत वाट बघावी लागणार आहे. दरम्यान, आयफोनसोबतच Realme, Redmi, Samsung आणि Poco सारख्या ब्रँडचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळेल.

अजून कोणत्या स्मार्टफोनचा समावेश ?

आयफोन 13 सीरीजअंतर्गत iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max असे तीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले. हे तिन्ही स्मार्टफोन वेगवेगळे फीचर्स, किंमत आणि कॅमेरा सेटअपसह येतात. यामध्ये सर्वात आकर्षक टॉप एंड व्हेरिएंट म्हणजे iPhone 13 Pro Max, ज्याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या फोन्समध्ये A15 बायोनिक चिपसेट वापरण्यात आला असून त्यामुळे उत्तम स्पीड आणि दमदार फीचर्सचा आनंद घेता येतो.

हे सुद्धा वाचा

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...