मोबाईल इंटरनेटशिवाय पेमेंट करा, Paytm ची ‘टॅप टू पे’ सुविधा सुरु, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस
भारतातील ग्राहक व व्यापाऱ्यांसाठीची आघाडीची डिजिटल परिसंस्था पेटीएमने आज 'टॅप टू पे'च्या लाँचची घोषणा केली. हे फीचर युजर्सना पीओएस मशिनवर त्यांचा फोन टॅप करत त्यांच्या पेटीएम रजिस्टर्ड कार्डच्या (व्हर्च्युअल) माध्यमातून त्वरित पेमेंट्स करण्याची सुविधा देते.
मुंबई : भारतातील ग्राहक व व्यापाऱ्यांसाठीची आघाडीची डिजिटल परिसंस्था पेटीएमने आज ‘टॅप टू पे’च्या लाँचची घोषणा केली. हे फीचर युजर्सना पीओएस मशिनवर त्यांचा फोन टॅप करत त्यांच्या पेटीएम रजिस्टर्ड कार्डच्या (व्हर्च्युअल) माध्यमातून त्वरित पेमेंट्स करण्याची सुविधा देते. फोन लॉक असताना किंवा मोबाइल डेटा किंवा इंटरनेट कनेक्शन नसतानादेखील ही सेवा कार्यरत राहते. पेटीएमची ‘टॅप टू पे’ सेवा पेटीएम ऑल-इन-वन पीओएस डिवाईसेस आणि इतर बँकांच्या पीओएस मशिन्सच्या माध्यमातून देय भरणाऱ्या अँड्रॉइड व आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे. (Paytm enables users to make payments without Internet by Tap to Pay feature from their virtual cards)
नवीन टॅप टू पे सेवेसह पेटीएम आपल्या प्रबळ तंत्रज्ञानाचा वापर करत निवडलेल्या कार्डच्या 16-अंकी प्रायमरी अकाऊंट नंबरला (पीएएन) सुरक्षित व्यवहार कोड किंवा ‘डिजिटल आयडेण्टिफायर’मध्ये बदलते. हे डिजिटल आयडेण्टिफायर खात्री देते की, युजर्सच्या कार्डची माहिती युजरपुरतीच मर्यादित राहिल आणि कोणत्याही थर्ड पार्टी पेमेंट प्रोसेसरसोबत शेअर केली जाणार नाही. युजर्स रिटेल आऊटलेटमध्ये गेल्यानंतर पीओएस डिवाईसवर टॅप करत देय भरू शकतात, ज्यासाठी व्यवहारादरम्यान कार्ड माहिती शेअर करण्याची गरज भासत नाही.
या नवीन फीचरसह एनएफसी (निअर फिल्ड कम्युनिकेशन) सपोर्ट असलेले कार्ड मशिन्स असलेल्या सर्व रिटेल आऊटलेट्समध्ये पेमेंट्स करता येऊ शकतात. पेटीएम अॅपवरील डेडिकेटेड डॅशबोर्डच्या माध्यमातून कार्ड्सचे व्यवस्थापन करता येऊ शकते. हे डॅशबोर्ड कार्डच्या व्यवहार हिस्ट्रीची माहिती देते आणि कोणत्याही क्षणी सुलभ स्टेप्समध्ये प्रायमरी टोकनाइज्ड कार्ड देखील बदलता येऊ शकते. तसेच हे डॅशबोर्ड युजर्सना आवश्यक असल्यास कार्ड बदलण्याची किंवा डि-टोकनाइज करण्याची सुविधा देखील देते.
मोबाइल डेटाशिवाय डिजिटल व्यवहार करण्याची सुविधा
पेटीएम प्रवक्ते याबाबत म्हणाले की, “आर्थिक सेवांचे खरे डिजिटायझेशन डेटाच्या मर्यादांमुळे त्यासंदर्भात येणारे अडथळे दूर झाल्यास शक्य आहे. टॅप टू पेच्या सादरीकरणासह आम्ही युजर्सना मोबाइल डेटासोबत किंवा मोबाइल डेटाशिवाय डिजिटल व्यवहार करण्याची सुविधा देत आहोत. या सेवेला पेटीएम ऑन-इन-वन पीओएसचे, तसेच बहुतांश प्रमुख बँका व कार्ड नेटवर्क्सचे पाठबळ आहे, ज्यामुळे युजर्सना व्यापक निवडी मिळतात.”
युजर्स सुलभपणे पेटीएम अॅपवरील ‘टॅप टू पे’ पर्यायाची निवड करू शकतात आणि पुढील स्टेप्स फॉलो करुन शकतात.
- कार्ड लिस्टमधून सेव्ह केलेले कार्ड निवडा किंवा टॅप टू पे होम स्क्रीनवरील ‘अॅड न्यू कार्ड’वर क्लिक करा.
- पुढील स्क्रीनवर आवश्यक कार्ड माहिती भरा.
- टॅप टू पेसाठी सेवा अटी स्वीकारा.
- कार्डसह नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर (किंवा ईमेल आयडीवर) आलेला ओटीपी प्रविष्ट करा.
- आता टॅप टू पे होम स्क्रीनच्या वरील बाजूस अॅक्टिव्ह झालेले कार्ड दिसेल.
इतर बातम्या
Google | वृत्त संकलनातील एकाधिकारशाहीचा दुरुपयोग, गुगलविरोधात भारतात चौकशीचे आदेश
शानदार ऑफर! Oppo चा 12 हजारांचा स्मार्टफोन 9 हजार रुपयांत खरेदीची संधी
कारसाठी NOC का गरजेचं? जाणून घ्या अप्लाय करण्याची सोपी ऑनलाईन पद्धत
(Paytm enables users to make payments without Internet by Tap to Pay feature from their virtual cards)