PDF फाइल्स एडिट करण्याचा सोपा मार्ग; पुन्हा पुन्हा नवीन पीडीएफ तयार करण्याची गरज नाही

PDF फाईल्स एडिट कशा कराव्यात असा प्रश्न तुम्हाला पडतो का? हे कार्य सोपे करण्यासाठी सांगितलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा. त्यानुसार तुम्ही तुमची PDF फाइल एडिट करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पेड सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार नाही.

PDF फाइल्स एडिट करण्याचा सोपा मार्ग; पुन्हा पुन्हा नवीन पीडीएफ तयार करण्याची गरज नाही
PDF फाइल्स एडिट करण्याचा सोपा मार्गImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 3:12 PM

अनेकदा आपल्याला PDF फाईल तयार करून ऑफिस मध्ये किंवा इतर कामाच्या ठिकाणी शेअर करावी लागते. जर पीडीएफमध्ये काही गडबड असेल तर पुन्हा पुन्हा कसे दुरुस्त करू शकतो? असा मोठा प्रश्न आपल्याला पडत असतो. यासाठी येथे आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमची समस्या काही मिनिटात सोडवू शकता. यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा नवीन पीडीएफ फाईल्स तयार कराव्या लागणार नाहीत. एकाच फाईलमध्ये तुम्हाला हव्या तेवढ्या वेळा एडिट करून पाठवता येणार आहे.

ऑनलाइन पीडीएफ एडिटर

तुमची एखाद्या पीडीएफ फाइलमध्ये काही बदल किंवा आणि एडिट करण्यासाठी तुम्हाला आता जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही गुगलवर ऑनलाइन पीडीएफ एडिटर सर्च करू शकता. येथे तुम्हला ऑनलाइन बरोबर पीडीएफ एडिट करण्याचा पर्याय मिळतो. हे तुम्ही थेट वेबसाइटवरून देखील करू शकता. अन्यथा गुगल प्ले स्टोअर वर जाऊन किंवा ॲपल ॲप स्टोअरवरही तुम्हाला अनेक ॲप्लिकेशन ऑपशन्स तुम्हाला मिळतात. यामध्ये तुम्ही वेबसाइट किंवा ॲपवर गेलात तर ते उघडताच तुम्हाला हा पर्याय मिळेल. पीडीएफ फाइल अपलोड करा आणि आपल्या फाईलमध्ये दुरुस्ती करा.

हे ॲप मदत करेल

PDF Text Editor: जर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये ॲप इन्स्टॉल करायचं असेल तर तुमच्याकडेही पीडीएफ टेक्स्ट एडिटर हा पर्याय आहे. हा पीडीएफ एडिटर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. गुगल प्ले स्टोअरवर या ॲपला ४.२ स्टार मिळाले आहेत. प्लॅटफॉर्मवरून 10 दशलक्षाहून अधिक लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. यामध्ये तुम्ही केवळ मजकूरच नाही तर इमेज आणि पीडीएफ देखील एडिट करू शकता.

हे सुद्धा वाचा

Adobe Acrobat Reader: ॲडोब ॲक्रोबॅट रीडर तुम्हाला या ॲप्लिकेशनद्वारे फोटो, मजकूर आणि बरेच काही सहजपणे एडिट करण्यास अनुमती देते. तुम्हाला हवे ते बदल तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक फाईल्स सेव्ह करण्याचा पर्याय मिळतो. आपण ते संकुचित देखील करू शकता.

या ॲप्लिकेशन्सव्यतिरिक्त तुम्हाला आणखी अनेक ॲप्सचे ऑप्शन्स मिळत आहेत. त्यांचे रिव्ह्यू आणि रेटिंगवाचून तुम्हाला हवं ते ॲप वापरू शकता.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.