फोनपेचा नवा फिचर! बँक खात्याशिवायही UPI पेमेंट शक्य, जाणून घ्या कसं कराल व्यवहार!
भारतामध्ये ३५० दशलक्ष UPI वापरकर्त्यांचा मोठा वर्ग असताना, अजूनही अनेक वृद्ध आणि ग्रामीण लोक डिजिटल पेमेंटच्या भीतीमुळे रोख रकमेवर अवलंबून आहेत. UPI सर्कलमुळे हे लोक डिजिटल अर्थव्यवस्थेत सामील होऊ शकतात, ज्यामुळे ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘कॅशलेस इकॉनॉमी’ला एक नवा वळण मिळेल.

डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे! फोनपे अॅपने आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फीचर आणलं आहे, ज्यामुळे आता बँक खात्याशिवायही UPI पेमेंट करता येणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने डिझाईन केलेलं हे फीचर ‘UPI सर्कल’ नावाने ओळखलं जातं आणि यामुळे अगदी ज्यांच्याकडे स्वतःचं बँक अकाउंट नाही अशांनाही डिजिटल व्यवहाराचा लाभ घेता येणार आहे.
UPI सर्कल म्हणजे नेमकं काय?
‘UPI सर्कल’ हे फीचर अशा लोकांसाठी उपयुक्त आहे, जे स्वतःचं बँक खातं नसतानाही UPI द्वारे व्यवहार करू इच्छितात. उदाहरणार्थ, घरातील वृद्ध व्यक्ती, कॉलेजमध्ये शिकणारी मुलं किंवा घरकाम करणारे कामगार — यांच्यासाठी हा पर्याय अगदी सोपा आणि सुरक्षित आहे.
हे फीचर कसं काम करतं?
प्रथम, फोनपे अॅपमध्ये ‘UPI सर्कल’ हा पर्याय निवडून प्राइमरी युजर आपला सर्कल तयार करतो. त्यानंतर ज्याचं बँक अकाउंट नाही, अशा सेकंडरी युजरला सर्कलमध्ये जोडतो.
प्राइमरी युजर सेकंडरी युजरसाठी दोन प्रकारच्या परवानग्या सेट करू शकतो:
या पद्धतीत सेकंडरी युजर दर महिन्याला ठराविक मर्यादेत जसे की ₹15,000 पर्यंत स्वयंपणे पेमेंट करू शकतो. प्रत्येक व्यवहार ₹5,000 पेक्षा जास्त नसावा, अशी मर्यादा असते.
या प्रकारात सेकंडरी युजर पेमेंट करण्यासाठी प्राइमरी युजरकडे विनंती पाठवतो. प्राइमरी युजर ती मंजूर करून UPI PIN टाकून व्यवहार पूर्ण करतो.
प्राइमरी युजरकडे प्रत्येक व्यवहाराचं नियंत्रण असतं. गरज भासल्यास तो सेकंडरी युजरच्या परवानग्या कधीही कमी-जास्त करू शकतो किंवा सर्कलमधून त्याला रद्दही करू शकतो.
UPI सर्कलचे फायदे काय?
1. बँक खात्याशिवाय व्यवहार शक्य2. खर्चावर पूर्ण नियंत्रण 3. सेकंडरी युजरला रोख रक्कम न ठेवता डिजिटल व्यवहार करण्याची मुभा 4. सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहारांची सुविधा
कोणाला सर्वाधिक फायदा?
हा फीचर विशेष ग्रामीण भागातील लोक, विद्यार्थी, घरातील वृद्ध व्यक्ती आणि दररोज रोख व्यवहार करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.