67W फास्ट चार्जरसह Poco F3 GT भारतात लाँच, वनप्लस नॉर्डला टक्कर

वनप्लस नॉर्ड 2 शी स्पर्धा करण्यासाठी पोको एफ 3 जीटी (Poco F3 GT) हा फोन शुक्रवारी भारतात लाँच करण्यात आला आहे.

67W फास्ट चार्जरसह Poco F3 GT भारतात लाँच, वनप्लस नॉर्डला टक्कर
Poco F3 GT
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 6:30 PM

मुंबई : वनप्लस नॉर्ड 2 शी स्पर्धा करण्यासाठी पोको एफ 3 जीटी (Poco F3 GT) हा फोन शुक्रवारी भारतात लाँच करण्यात आला आहे. Poco F3 GT हा पोकोने एफ सीरिजअंतर्गत लाँच केलेला दुसरा स्मार्टफोन आहे आणि जवळजवळ तीन वर्षांपूर्वी लॉन्च केलेल्या पोको एफ 1 चा सक्सेसर आहे. विशेष म्हणजे हा फोन रेडमी के 40 गेमिंग एडिशनची रीब्रँडेड आवृत्ती आहे, जी या वर्षाच्या सुरुवातीला चीनमध्ये लाँच करण्यात आली होती. (Poco F3 GT launched in India with 67W fast charger, check price and features)

Poco F3 GT मीडियाटेक डायमेंशन 1200 प्रोसेसरसह येतो. तसेच ट्रिपल रियर कॅमेरा मॉड्यूल, 120 हर्ट्ज एमोलेड डिस्प्ले आणि गेमिंगसाठी शोल्डर बटणांसह सादर करण्यात आला आहे. पोको फोनसह 67W फास्ट चार्जर देखील देत आहे. वनप्लस नॉर्ड 2 व्यतिरिक्त, पोको एफ 3 जीटी गेमिंगप्रेमी युजर्सना अधिक परवडणारा पर्याय देत Asus ROG सिरीजशीदेखील स्पर्धा करेल.

Poco F3 GT ची भारतातील किंमत

भारतात Poco F3 GT ची किंमत 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 26,999 रुपये, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 28,999 रुपये इतकी असेल, तर फोनच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये इतकी असेल.

पोकोने F3 GT सह मॅड रिव्हर्स प्राइसिंग (MRP) संकल्पना सादर केली आहे, जिथे फोन पहिल्या आठवड्यात (2 ऑगस्ट 2021 पर्यंत) 1,000 रुपये कमी किंमतीत विकला जाईल. दुसर्‍या आठवड्यात (3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान) फोन मूळ किंमतीपेक्षा 500 रुपये कमी किंमतीत विकला जाईल. 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 नंतर हा फोन वर नमूद केलेल्या मूळ किंमतीत विकला होईल. या फोनसाठी प्री-ऑर्डर 24 जुलैपासून सुरू होतील आणि 26 जुलैपासून सेल सुरू होईल. ग्राहक हा फोन आयसीआयसीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून खरेदी करत असतील तर त्यांना 1000 रुपयांची सूट मिळेल.

Poco F3 GT चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Poco F3 GT ग्लास रियर पॅनलसह सादर करण्यात आला आहे. प्रीडेटर ब्लॅक आणि गनमेटल सिल्व्हर या दोन रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे. AMOLED डिस्प्लेसह येणारा हा पहिला पोको स्मार्टफोन आहे. Poco F3 GT मध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120 हर्ट्ज रीफ्रेश रेट आणि एचडीआर 10+ सपोर्टसह येतो.

Poco F3 GT मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य शूटर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड शूटर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये Xiaomi आणि Poco च्या इतर स्मार्टफोनप्रमाणे साईड माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

इतर बातम्या

48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

35000 रुपयांच्या डिस्काऊंटसह लॅपटॉप, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

WhatsApp चं Joinable Group Calls फीचर लाँच, आता व्हिडीओ, ग्रुप कॉल अजून मजेदार होणार

(Poco F3 GT launched in India with 67W fast charger, check price and features)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.