6000mAh ची बॅटरी, 48MP चा कॅमेरा, शाओमीचा दमदार फोन लाँच होतोय, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
पोको (Poco) या स्मार्टफोन ब्रॅण्डसाठी यंदाचं वर्ष फार चांगलं ठरलेलं नाही. कंपनी यावर्षी अनेक स्मार्टफोन लाँच करणार होती, ज्याबाबत अजूनही प्रक्रिया सुरु आहे.
मुंबई : काही वर्षांपूर्वी लाँच झालेल्या पोको (Poco) या स्मार्टफोन ब्रॅण्डसाठी यंदाचं वर्ष फार चांगलं ठरलेलं नाही. कंपनी यावर्षी अनेक स्मार्टफोन लाँच करणार होती, ज्याबाबत अजूनही प्रक्रिया सुरु आहे. Poco च्या काही स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यात आता कंपनीने आणखी एका स्मार्टफोनची घोषणा केली आहे. परंतु यावेळी कंपनीने लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. (Poco M3 confirmed set for launch on november 24)
कंपनीच्या प्रोडक्ट मॅनेजरने या स्मार्टफोनचा एक टीझर लाँच केला असून 24 नोव्हेंबर रोजी हा स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे सांगितले आहे. या स्मार्टफोनचं नाव Poco M3 असं आहे. Poco च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरही या फोनचा टीझर लाँच करण्यात आला आहे.
आतापर्यंत अनेकदा कंपनीच्या M आणि C सीरिजमधील फोन रेडमीच्या डिव्हाईससोबत रिब्रॅण्ड करण्यात आले आहेत. Poco M3 रिब्रॅण्ड केला जाणार आहे की नाही, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र हा फोन पाहिल्यानंतर लक्षात येतं की, हा फोन रेडमीच्या नोट 9 सीरीजपासून प्रेरणा घेत बनवलेला आहे.
आतापर्यंत या फोनबाबत मिळालेल्या माहितीनुसार हा फोन अंड्रॉयड 10 वर काम करेल. यामध्ये 4 जीबी रॅम 6.53 इंचांचा FHD+ डिस्प्ले आणि 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. या फोमध्ये 6000mAh इतक्या क्षमतेची बॅटरी असेल जी 22.5W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
I don’t know about you, but I truly miss the feeling of waiting for a new POCO to be revealed. ? Introducing POCO M3, Our MOST ???? yet! ?#POCOM3 Is #MoreThanYouExpect pic.twitter.com/pQKQoGbFSe
— POCO (@POCOGlobal) November 17, 2020
256GB स्टोरेज आणि 64MP कॅमेरा असलेला Realme चा 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर
Realme ही चिनी स्मार्टफोन कंपनी गेल्या वर्षभरापासून देशातील अनेक मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहे. कंपनीने आता भारतात X7 सिरीज लाँच करण्याचे ठरवले आहे. X7 सिरीज कधी लाँच होणार याबाबतची कोणतीही माहिती कंपनीने जाहीर केली नसली तरी हा फोन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लाँच केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. या सिरीजमध्ये दोन स्मार्टफोन असणार आहेत. X7 आणि X7 प्रो अशी या स्मार्टफोनची नावं असतील.
रियलमी X7 या फोनमध्ये तुम्हाला 6.55 इंचांचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेस दिली जाईल. ही मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येईल. कॅमेऱ्याच्या बाबतीतही हा फोन दमदार आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सेल्सचा सोनीचा IMX686 प्रायमरी सेन्सर दिला जाणार आहे. तसेच 8 मेगापिक्सेलचा अजून एक सेन्सर, 2 मेगापिक्सेलचा पोट्रेट सेन्सर, 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर दिला जाईल. तसेच सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेकंडरी कॅमेरा) दिला जाईल. तसेच फोनमध्ये 4500mAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे.
संबंधित बातम्या
8MP कॅमेरा, 128 GB स्टोरेज आणि डुअल स्क्रीन असलेल्या ‘या’ स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट
Honor चा 4 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स
(Poco M3 confirmed set for launch on november 24)