AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Poco M4 5G लाँचची तारीख जाहीर.. फोनमध्ये मिळेल 50MP कॅमेरा सेटअप आणि बरेच काही..

Poco ने या स्मार्टफोनची लॉंचची तारीख जाहीर केली आहे. तसेच Poco Watch आणि Buds Pro Genshin Impact Edition लाँच, विक्रीची तारीख आणि किंमत यासह सर्व तपशील जाणून घ्या

Poco M4 5G लाँचची तारीख जाहीर.. फोनमध्ये मिळेल 50MP कॅमेरा सेटअप आणि बरेच काही..
Poco mobileImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 6:30 AM

नवी दिल्लीः Poco एक नवीन स्मार्टफोन Poco M4 5G भारतात लॉंच (Launched in India)करीत आहे. हा फोन, कंपनीच्या M4-सीरीजमध्ये Poco M4 Pro आणि Poco M4 Pro 5G सह सामील होईल. समोर आलेल्या माहितीनुसार, Poco M4 5G च्या मागील बाजूस दोन कॅमेरा सेन्सर असतील, त्यापैकी एक 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर असेल. Poco इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने (Official Twitter account) एका ट्विटद्वारे सांगितले की, Poco M4 5G स्मार्टफोन 29 एप्रिल 2022 रोजी भारतात लॉंच होईल. ट्विटनुसार, हा फोन फ्लिपकार्टच्या माध्यमातून (Via Flipkart) विकला जाईल. कंपनीने पोस्टमध्ये या डिवाइसचे डिझाईन देखील दाखवले आहे. हा फोन पिवळा आणि निळा या दोन कलर व्हेरियंटमध्ये दिसणार आहे.

कॅमेरा सेटअप

मागील बाजूस दोन कॅमेरा सेन्सर आहेत. कॅमेरा मॉड्युल हा फोनच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत एक काळी पट्टी आहे. यावर पोको ब्रँडिंग देखील आहे. फोनच्या खालच्या बाजूला 5G लिहिलेले आहे.

Poco M4 5G चे स्पेसिफिकेशन

Poco M4 5G चे स्पेसिफिकेशन्स आधीच लीक झाले आहेत. योगेश ब्रार यांच्या मते, या डिव्हाइसमध्ये 6.58-इंचाची FHD + LCD स्क्रीन असेल, जी 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह सुसज्ज असेल, जो 4GB / 6GB LPDDR4X RAM आणि 64GB / 128GB UFS2.2 स्टोरेजसह जोडला जाईल. लीकनुसार, Poco M4 5G च्या मागील बाजूस दोन कॅमेरा सेन्सर असतील, त्यापैकी एक जो 50MP आहे. एक प्राथमिक कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर असेल. फोनमध्ये समोर 5MP सेल्फी कॅमेरा असू शकतो.

फास्ट चार्जिंगला सपोर्ट

हाती आलेल्या माहितीनुसार, बॉक्समधून बाहेर येताच हा डिवाइस Android 12 वर तयार केलेल्या MIUI 13 वर काम करेल. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी असू शकते, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. असेही म्हटले जात आहे की Poco M4 5G स्मार्टफोन हा Redmi Note 11E ची रीब्रँडेड व्हर्जन असेल, जी Xiaomi ने काही काळापूर्वी चीनमध्ये सादर केली होती. आतापर्यंत, Poco डिव्‍हाइसबद्दल आढळलेले निर्देश Redmi Note 11E शी जुळत असल्याचीही चर्चा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.