8GB/256GB, क्वाड कॅमेरासह Poco X3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

पोको कंपनी आपला नवीन स्मार्टफोन पोको एक्स 3 भारतात लाँच करणार आहे. पोको एक्स 3 प्रो गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात लाँच केला होता.

8GB/256GB, क्वाड कॅमेरासह Poco X3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
Poco X3 Pro
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 10:53 AM

मुंबई : पोको (Poco) कंपनी आपला नवीन स्मार्टफोन पोको एक्स 3 (Poco X3) भारतात लाँच करणार आहे. पोको एक्स 3 प्रो गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात लाँच करण्यात आला होता. हा फोन पोको एफ 3 सोबत लाँच करण्यात आला होता. स्मार्टफोन निर्माता कंपनी अनेक दिवसांपासून या फोनची जाहिरात करत आहे. हा फोन आज दुपारी 12 वाजता भारतात लाँच होईल. (Poco X3 Pro will be launched in India today, check features and price)

एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये पोको एक्स 3 प्रो स्मार्टफोन लाँच केला जाईल. हा ऑनलाइन कार्यक्रम पोकोच्या युट्यूब चॅनेलवरुन आणि पोकोच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

पोको X3 प्रो बद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला जाईल जो फुल एचडी + डिस्प्लेसह येईल. हा फोन 120 हर्ट्ज रीफ्रेश रेट, 240 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शनसह येईल. जर आपण याच्या कॅमेर्‍याबद्दल चर्चा केली तर फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेन्सर असतील. पोको एक्स 3 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसरसह येणारा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल.

फीचर्स

सेल्फीसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. या फोनच्या इतर फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर देण्यात येईल. हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह सादर होईल. फोनची बॅटरी 5160mAh असेल. त्याच वेळी, 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. या फोनमध्ये साइड माउंट केलेला फिंगरप्रिंट सेन्सर, अँड्रॉइड 11, ब्लूटूथ 5.0 आणि एनएफसी असेल.

किंमत

या फोनची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असेल. जेव्हा हा फोन जागतिक बाजारात लाँच केला गेला होता तेव्हा त्याची किंमत 21,400 रुपये होती जिथे तुम्हाला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली होती. तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला 25,700 रुपये द्यावे लागतील. हा फोन ब्लॅक, फ्रॉस्ट ब्लू आणि मेटल ब्रॉन्झ रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Poco F3 चे फीचर्स

पोको एफ 3 स्मार्टफोन 6.67 इंच एमोलेड डिस्प्ले आणि फुल एचडी + रेझोल्यूशनसह येईल. हा 120 हर्ट्झच्या रीफ्रेश रेटसह येईल. स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह यात 8 जीबी रॅमही मिळेल. फोनच्या मागील बाजूस 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर देण्यात येईल. सेल्फीसाठी फोनमध्ये 20-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा असेल. तसेच या फोनमध्ये 4520mAh बॅटरी असेल, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन अँड्रॉयड 11 वर आधारीत असेल.

इतर बातम्या

OnePlus 9 ला टक्कर देणाऱ्या Vivo X60 Pro मध्ये काय आहे खास?

नव्या लेन्ससाठी Xiaomi-Samsung चं संशोधन, Mi 11 मध्ये मिळणार दमदार कॅमेरा

एक एप्रिलपासून महागणार आपले फेव्हरेट स्मार्टफोन, झटपट करा खरेदी

(Poco X3 Pro will be launched in India today, check features and price)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.