पुढच्या आठवड्यात JioPhone Next चं प्री-बुकिंग सुरु, 2500mAh बॅटरीसह दमदार कॅमेरा मिळणार
रिलायन्सचा नवीन परवडणारा स्मार्टफोन, जो गुगलच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे, त्या जिओफोन नेक्स्टची पुढील महिन्यापासून भारतात विक्री सुरु होणार आहे, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.
मुंबई : रिलायन्सचा नवीन परवडणारा स्मार्टफोन, जो गुगलच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे, त्या जिओफोन नेक्स्टची पुढील महिन्यापासून भारतात विक्री सुरु होणार आहे. एका नवीन अहवालात, असे सांगितले जात आहे की, ग्राहक पुढील महिन्याच्या 10 तारखेपासून हा फोन प्री-बुक करू शकतात. रिटेल सूत्रांच्या हवाल्याने 91 मोबाईल्सने त्यांच्या अहवालात दावा केला आहे की, भारतात JioPhone Next ची प्री-बुकिंग पुढील आठवड्यापासून सुरू होऊ शकते. (Pre booking of JioPhone Next will start from next week)
या अहवालात असे म्हटले आहे की, रिलायन्स त्यांच्या किरकोळ विक्रेत्यांशी चर्चा करत आहे आणि JioPhone Next बद्दल अधिक तपशील पुढील काही दिवसात किरकोळ विक्रेत्यांसह शेअर केला जाईल. याचा अर्थ असा की, आपण रिलायन्सकडून आगामी काळात अशाच प्रकारच्या घोषणेची अपेक्षा करू शकतो. जिओफोन नेक्स्टच्या लाँचिंगदरम्यान कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले होते की, हा स्मार्टफोन भारत आणि जगभरातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल.
जिओ फोन नेक्स्टमध्ये गुगल अँड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टिम दिली जाईल जी अँड्रॉइड 11 वर आधारित असेल. अँड्रॉइड गोच्या मदतीने ग्राहक अँड्रॉइड फोनच्या मूलभूत अनुभवाचा आनंद घेऊ शकतील. येथे त्यांना गुगलच्या सर्व्हिसचाही अॅक्सेस मिळेल, ज्याद्वारे सॉफ्टवेअर अपडेट, गुगल असिस्टंट आणि गुगल प्ले स्टोअरवरून अॅप्स डाउनलोड करण्याची परवानगी मिळेल. युजर्स या फोनमध्ये सर्व लोकप्रिय गेम डाउनलोड करण्यास सक्षम असतील.
कोणते फीचर्स मिळणार?
जिओ फोन नेक्स्टमध्ये क्वालकॉम द्वारे लो एंड चिपसेट देण्यात येईल. रहमान यांच्या ट्विटनुसार, डिव्हाइसमध्ये क्वालकॉम QM215 प्लॅटफॉर्म दिला जाईल. यात 64 बिट CPU आणि ड्युअल ISP सपोर्ट असेल. फोनमध्ये 2 जीबीपेक्षा कमी रॅम देण्यात येईल. त्याच वेळी, स्टोरेजच्या बाबतीत, त्यात 32 जीबी आणि 64 जीबी असे दोन पर्याय मिळू शकतात. याशिवाय यात मायक्रो एसडी कार्ड स्लॉटचा पर्यायही दिला जाईल.
इतर स्पेक्स
डिव्हाइसमध्ये 5.5 इंच आणि 6 इंच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. रिझोल्यूशनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात 1440 * 720 पिक्सलचे HD रिझोल्यूशन दिले जाईल. बॅटरीबद्दल माहिती मिळालेली नाही, परंतु या फोनची बॅटरी 3000 ते 4000mAh च्या दरम्यान असू शकते. त्याचबरोबर फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट दिला जाईल. फोनमध्ये वायफाय आणि ब्लूटूथ सपोर्टही दिला जाईल. त्याचबरोबर फोनची किंमत 3500 रुपयांच्या आसपास असू शकते.
इतर बातम्या
6GB/128GB, 108MP ट्रिपल कॅमेरा, मोटोरोलाचा Edge 20 Fusion बाजारात
17 सप्टेंबरपासून Iphone 13 ची विक्री, 30 सप्टेंबरला नव्या एअरपॉड्सचं लाँचिंग, लीक्समधून खुलासा
30 फिटनेस मोड, SpO2 मॉनिटरिंग फीचरसह Mi Band 6 भारतात लाँच, किंमत…
(Pre booking of JioPhone Next will start from next week)